• Download App
    कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसामुळे भात शेतीचे नुकसान | Loss to farmers and daily life due to unseasonal rain

    कोल्हापूरमध्ये अवकाळी पावसामुळे भात शेतीचे नुकसान

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये अलीकडे सतत हवामान बदलते आहे. ढगाळ वातावरण असते. सकाळी आठ वाजता पहाटेचे पाच वाजले आहेत असे वातावरण होते. चार दिवस थोडाफार पाऊस होतो आहे.

    Loss to farmers and daily life due to unseasonal rain


    ऐन थंडीतही पावसाची हजेरी , कोल्हापूरमधे जनजीवन विस्कळीत ; शेतकऱ्यांचंही भरपूर नुकसान


    बुधवारी सकाळी सुमारे अर्धा तास जोरात पाऊस झाला. सकाळी कामावर निघालेल्या लोकांची त्रेधातिरपिट झाली. शहरांमध्ये रस्त्यांवर चिखल झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे गुह्राळ चालवणारे तसेच साखर कारखान्यांनाही फटका बसला आहे. अनेक ठिकाणी कापणी केलेले भात भिजले आहे. या आठवड्यात पावसाच्या तुरळक सरी जिल्ह्यामध्ये पडत होत्या. बुधवारी आता हिवाळा चालू आहे का पावसाळा हेच कळत नव्हते. सकाळी रिमझिम पाऊस पडत होता. परंतु नंतर अर्धा तास जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले व शेतकऱ्याना या पावसामुळे फटका बसला आहे.

    Loss to farmers and daily life due to unseasonal rain

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस