• Download App
    Pegasus Controversy : फडणवीसांनी विरोधकांना धरले धारेवर, सांगितली यूपीए काळातली टॅपिंग, काही माध्यमांना चिनी फंडिंग अन् बदनामीचा कट । LoP Devendra Fadnavis Attacked on Opposion amid Pegasus Controversy in Press Conference Mumbai

    Pegasus Controversy : फडणवीसांनी विरोधकांना धरले धारेवर, सांगितली यूपीए काळातली टॅपिंग, काही माध्यमांना चिनी फंडिंग अन् बदनामीचा कट

    Pegasus Controversy : मंगळवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी विरोधी पक्षातील सदस्यांनी पेगासस सॉफ्टवेअरवरून हेरगिरी केल्याच्या आरोपावरून लोकसभेत वेलमध्ये गोंधळ घातला. यामुळे लोकसभेच्या सभापतींनी 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढविला. फडणवीस म्हणाले की, संसद सुरळीत चालवावी अशी विरोधी पक्षांची इच्छा नाही. ते म्हणाले की, पेगासस प्रकल्प देशाला बदनाम करण्याचा कट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये टेलीग्राफ कायदा मजबूत आहे. बेकायदा हॅकिंग होत नाही हे स्पष्ट झाले आहे. LoP Devendra Fadnavis Attacked on Opposion amid Pegasus Controversy in Press Conference Mumbai


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मंगळवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी विरोधी पक्षातील सदस्यांनी पेगासस सॉफ्टवेअरवरून हेरगिरी केल्याच्या आरोपावरून लोकसभेत वेलमध्ये गोंधळ घातला. यामुळे लोकसभेच्या सभापतींनी 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढविला. फडणवीस म्हणाले की, संसद सुरळीत चालवावी अशी विरोधी पक्षांची इच्छा नाही. ते म्हणाले की, पेगासस प्रकल्प देशाला बदनाम करण्याचा कट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये टेलीग्राफ कायदा मजबूत आहे. बेकायदा हॅकिंग होत नाही हे स्पष्ट झाले आहे.

    पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत म्हटले की, भारतीय संसजेचं अधिवेशन डिरेल करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे. एक-दोन मीडिया हाऊसेसना चायनीज फंडिंग होत आहे. त्याद्वारे बदनामीचा अंजेडा राबवला जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करुन सर्व जाती धर्माच्या लोकांना पंतप्रधान मोदी यांनी संधी दिली आहे. अशावेळी अधिवेशन डिरेल करण्याच्या उद्देशानं अधिवेशनाचं कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही मीडिया हाऊसेसनी Pagasusच्या बातम्या दाखवल्या, छापल्या. काहींनी एक यादीही दिली. पण त्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अशा कोणत्याही पद्धतीचं हॅकिंग करत नाही. आपल्याकडे असलेल्या टेलिग्राफ अॅक्टनुसार आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यामुळे असं काही करण्याची गरजंच नाही, असं फडणवीसांनी म्हटलंय.

    मनमोहन सिंगांच्या काळात अनेकदा फोन टॅपिंग

    फडणवीस म्हणाले की, संबंधित विभागानं अशा बातम्या देणाऱ्यांना नोटीस दिली आहे. लवकरच सत्य काय ते समोर येईल. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळातही फोन टॅपिंगचा आरोप झाला होता. तेव्हा उत्तर देताना मनमोहन सिंह यांनी आम्ही नाही तर एका खासगी एजन्सीने फोन टॅपिंग केल्याचं सांगितलं होतं. इतकंच नाही तर जे काम झालं आहे ते कायदेशीर झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. लोकसभेत याबाबत माहिती देताना फोन टॅपिंग हे राष्ट्रीय सुरक्षा, टॅक्स चोरी आणि मनी लॉड्रिंग रोखण्यासाठी फोन टॅप झाल्याचं सांगितलं. तसंच ते योग्य असल्याचं समर्थनही केलं होतं. त्याचबरोबर फोन टॅपिंगची बातमी येणं चुकीचं असल्याचं सांगत याबाबत यापुढे काळजी घेऊ, असंही ते म्हणाले होते. UPAच्या काळात एकदा नाही तर अनेकदा फोन टॅपिंग झालं आणि ते कसं कायदेशीररीत्या योग्य आहे हेदेखील सांगण्यात आलं होतं.

    भारताच्या बदनामीचा कट

    फडणवीस म्हणाले की, पेगाससमध्ये 45 देशांचा उल्लेख आहे. पण चर्चा फक्त भारताचीच केली जात आहे. जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूनं हे सगळं केलं जात आहे. एक-दोन मीडिया हाऊसला चायनिज फंडिग येत आहे. त्याद्वारे एक बदनामीचा अजेंडा राबवला जात आहे. भारताला बदनाम करण्याचं हे एक षडयंत्र आहे. अशा बदनामीचा आम्ही निषेध करतो. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तोपर्यंत NSOच्या कोणत्याही यंत्रणा आम्ही वापरल्या नाहीत. माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात असं कधीही झालं नाही. काही परदेशी एजन्सी भारताला बदनाम करत आहेत. त्याचाच एक भाग आपण बनू नका, असंही फडणवीसांनी सांगितलं.

    LoP Devendra Fadnavis Attacked on Opposion amid Pegasus Controversy in Press Conference Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य