• Download App
    लोणंद मुक्कामी वारकऱ्यांचा मेळा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण आज चांदोबाचा लिंब येथे |Lonand First Ringan of Santshrestha Dnyaneshwar Maharaj Palkhi today at Chandobacha Limb

    लोणंद मुक्कामी वारकऱ्यांचा मेळा : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण आज चांदोबाचा लिंब येथे

    प्रतिनिधी

    सातारा : सातारा जिल्ह्यात माऊलींचे लोणंदला दोन, तरडगावला एक, फलटणला दोन तर बरडला एक असे एकूण सहा मुक्काम होणार आहेत. माऊलींचा पालखी सोहळा लोणंद मुक्कामी आल्यावर कोकणासह राज्यातून येणाऱ्या अनेक दिंड्या माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याने भाविकांची संख्या लोणंद मुक्कामी वाढली आहे.Lonand First Ringan of Santshrestha Dnyaneshwar Maharaj Palkhi today at Chandobacha Limb

    कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो भाविकांनी लोणंद मुक्कामी संत ज्ञानेश्वर महाराजाच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे. माऊलीची दर्शन रांग पालखीतळ ते खंडाळा चौक ते सातारा रोड जुनी भाजी मंडई अशी सुमारे 1 किलोमीटरपर्यंत गेलेली होती. लोणंद मुक्कामी लोणंदकर ग्रामस्थ वाजत गाजत येऊन माऊलींना मानाचा नैवेद्य अर्पण करत होते. लोणंद मुक्कामी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची व भाविकांची कसलीही गैरसोय होऊ नये म्हणुन जिल्हा प्रशासन सतर्क राहुन काम करत आहे.



    लोणंद नगरपंचायत मदत कक्षामध्ये नगरपंचायत, आरोग्य विभाग, महसुल, पंचायत समिती, विज वितरण आदी विभागाचे विभाग प्रमुख सोहळ्यातील भाविकांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करताना दिसत होते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा लोणंद मधुन गुरुवारी दुपारी पुढील वाटचालीसाठी मार्गस्थ होणार आहे.

    चांदोबाचा लिंब येथे गुरुवारी होणार उभे रिंगण

    गुरुवार दि. ३० रोजी दुपारी एक वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तरडगाव मुक्कामासाठी लोणंद पालखी तळावरून मार्गस्थ होणार आहे. लोणंद -फलटण रोडवर लोणंद नजीक चांदोबाचा लिबं या ठिकाणी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिगंण होणार आहे.

    Lonand First Ringan of Santshrestha Dnyaneshwar Maharaj Palkhi today at Chandobacha Limb

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस