Lockdown : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव काटेवाडी येथे सात दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक पुणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट मंद झाली असली, तरी बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या सात गावांमध्ये टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावाचाही समावेश आहे. Lockdown in seven Villages in Baramati including Deputy CM Ajit Pawar Native Village Katewadi
विशेष प्रतिनिधी
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव काटेवाडी येथे सात दिवसांसाठी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. बारामतीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वास्तविक पुणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट मंद झाली असली, तरी बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोरोना हॉटस्पॉट असणाऱ्या सात गावांमध्ये टाळेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावाचाही समावेश आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावात कोरोनाचे जास्त रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान बारामतीत एका दिवसात 500 रुग्ण आढळले होते, तेव्हापासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात खाली आली आहे. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुक्यातील सात मोठ्या गावांत टाळेबंदीची घोषणा केली आहे. या गावांत 7 जुलैपर्यंत लॉकडाऊन राहील.
आतापर्यंत बारामतीतील रुग्णांची संख्या 25 हजार 431 आहे, त्यापैकी 24 हजार 474 रुग्ण बरे झाले आहेत. बारामती शहर व तालुक्यात अद्याप नऊशे पन्नासहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. संक्रमणाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी गावात अँटिजन चाचणीही प्रशासनाने केली. 27 लोकांचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर ग्रामस्थांनी प्रशासनाची साथ देत सात दिवस हे गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
Lockdown in seven Villages in Baramati including Deputy CM Ajit Pawar Native Village Katewadi
महत्त्वाच्या बातम्या
- JK Leaders Meet : जम्मू-काश्मीरवर साडेतीन तास मंथन, पंतप्रधान मोदींचा फ्यूचर प्लॅन, असे आहे टॉप 10 मुद्दे
- GOOD NEWS : महाराष्ट्रात 16 हजार 500 कोटींची गुंतवणूक ; 5 हजारांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी ; वाचा सविस्तर
- Fact Check : दक्षिण आफ्रिकेतील महिलेला एकावेळी 10 मुलं ? काय आहे सत्य;चकीत करणारे खुलासे
- India Corona Vaccination : देशात दिवसात ६० लाख जणांचे लसीकरण, महाराष्ट्र, गुजरात आघाडीवर; आतापर्यंत २.७४ कोटी नागरिकांना डोस
- बहिणीच्या तक्रारीवरून प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना मुंबई पोलीसांनी घेतले ताब्यात