- मंदिरामध्ये गर्दी तशी कमीच होते
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मॉल, बारमध्ये गर्दी होते, त्यापेक्षा कमी गर्दी ही मंदिरात होते. मद्यालये सुरू आहेत. खरे तर सामाजिक अंतराचे निकष पाळून मंदिरं सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घेतला पाहिजे. अनेक गरिबांची उपजिविका त्यावर आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. Liquor shops are open And temples are Closed. It is wrong thing: Fadnavis
राज्यातील मंदिरे बंद ठेवण्यामागे काय कारण काय आहे ? जेवढी गर्दी बार आणि मॉलमध्ये होते, त्यापेक्षा कमीच गर्दी मंदिरांमध्ये होते. सोशल डिस्टन्सिंग पाळून मंदिरे सुरु करता येऊ शकतील. मंदिरे सुरु करण्यामागचा भाव हा फक्त धार्मिक नाही, तर त्यामागे खूप मोठा वर्ग, समाज जोडलेला आहे. हार बनवणारे, कुंकू विकणारे, प्रसाद विकणारे, मंदिरातले पुजारी, सफाईवाले असा खूप मोठा गरीब समाज मंदिरांवर अवलंबून आहे. दोन वर्षांपासून या समाजावर अन्याय. राज्य सरकारने या वर्गाला कोणतीही मदत केलेली नाही.
- मद्यालये सुरु, मंदिरे मात्र बंद हे चुकीचे : फडणवीस
- सामाजिक अंतर ठेवून मंदिरे खुली करावीत
- अनेक गरिबांची उपजिविका अवलंबून आहे
- हार फुले विक्रेते, पुजारी यांच्या चरितार्थाचे काय?
- दोन वर्षांपासून या समाजावर अन्याय झाला
- राज्य सरकारने त्यांना कोणतीच मदत केली नाही