Thursday, 8 May 2025
  • Download App
    सिंह कधी गिधडधमकीला घाबरत नाही, देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना सुनावले|Lion never afraid of vultures, Devendra Fadnavis told Sanjay Raut

    सिंह कधी गिधडधमकीला घाबरत नाही, देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना सुनावले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : रोज सकाळी 9 वाजता येऊन संजय राऊत करमणुकीचा खेळ करतात, मी त्यांना इतकेच सांगतो सिंह कधी गिधडधमकीला घाबरत नाही, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिला आहे.Lion never afraid of vultures, Devendra Fadnavis told Sanjay Raut

    भाजपसोबत युती तुटल्यानंतर ईडी आपल्याला मुद्दामून त्रास देत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होता. राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना देखील एक पत्र पाठवले आहे. आम्ही जर तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, मी काय बोलतोय ते देवेंद्र फडणवीस यांना माहित आहे, असा इशारा आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिला होता.



    यावर फडणवीस म्हणाले, ईडी काय करेल हे ईडी सांगेल, ते का करतात हे देखील ईडी सांगेल, मला असे वाटते की, संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदींच्या सरकारमध्ये कुणाचाही बळी दिला जाते नाही. राऊतांनी व्हिक्टिम कार्ड खेळणे सोडून दिले पाहिजे.

    दिवसभर आपण कसे चर्चेत राहू यासाठी संजय राऊत अशा प्रकारची वक्तव्य करतात, राऊत संपादक असल्याने हेडलाईन कशी द्यायची हे त्यांना चांगले माहित आहे.
    महाराष्ट्रात भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत प्रखरतेने काम करेल, आणि पूर्ण शक्तीने आम्ही आमच्या बहुमताने महाराष्ट्रामध्ये सरकार पुन्हा स्थापन करू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

    Lion never afraid of vultures, Devendra Fadnavis told Sanjay Raut

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण