• Download App
    ८० च्या दशकांतील मराठी चित्रपट अभिनेत्री आशा काळे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर Lifetime Achievement Award announced to Asha Kale, Marathi film actress of 80s

    ८० च्या दशकातील मराठी चित्रपट अभिनेत्री आशा काळे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

    विशेष प्रतिनिधी 

    पुणे :  80 च्या दशकात विविध चित्रपटांच्या माध्यमातून दमदार अभिनय करणाऱ्या, चार दशकाहून अधिक चित्रपटसृष्टीत कार्यरत असणाऱ्या , ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे अनेक कलाकारांचे रसिका प्रेक्षकांचं श्रद्धास्थान आहे.   Lifetime Achievement Award announced to Asha Kale, Marathi film actress of 80s

    यंदा बालगंधर्व रंगमंदिराच्या 55 वा वर्धापन दिनं साजरा होतं आहे.निमित्तानं हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे.

    उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित यांच्या उपस्थित हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याचं उद्घाटन उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे . 26 ते 28 जून दरम्यान विविध कलात्मक कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांसाठी असणार आहे.

    यामध्ये त्प्रामुख्याने जादूचे प्रयोग, महाराष्ट्राची लोकधारा, चांडाळ चौकडीच्या करामती, प्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांची मुलाखत, मनिषा लताड प्रस्तूत हिटस् ऑफ लता मंगेशकर आणि आर. डी. बर्मन संगीत रजनी, पारंपारिक भारूड या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे.शाहीर दादा कोंडके यांच्या ढंगात ‘दादांची आठवण आली का’, द इन्स्ट्रुमेंटल आर.डी., तसेच चर्चासत्रात थेट भेट नाट्य-चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यांच्याशी सौमित्र पोटे यांनी साधलेला संवाद आणि यावर्षी पहिल्यांदाच मास्टर जयसिंग पाचेगांवकर सह लता-लंका पाचेगांवकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे सादरीकरण होणार आहे.

    Lifetime Achievement Award announced to Asha Kale, Marathi film actress of 80s

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Akot BJP : अकोटमधील भाजप-MIM युती तुटली; देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीनंतर निर्णय, आमदार भारसाखळेंना कारणे दाखवा नोटीस

    Mahesh Landge : अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका; स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपसोबत आले, आमदार महेश लांडगेंचा हल्लाबोल

    Jayant Patil : जयंत पाटलांनी सांगितले पडद्यामागील राजकारण; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरही केले भाष्य