• Download App
    मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र, पोलिसांत करणार तक्रार दाखल। Letter threatening to kill Mumbai Mayor Kishori Pednekar, will lodge a complaint with the police

    मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र, पोलिसांत करणार तक्रार दाखल

    मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवण्यात आले आहे. महापौर पेडणेकर सध्या आशिष शेलार वादावरून चर्चेत आहेत. पेडणेकरांना यापूर्वीही २०२० मध्येही धमक्या आल्या होत्या. अज्ञाताने तेव्हा फोनवरून धमकी दिली होती. Letter threatening to kill Mumbai Mayor Kishori Pednekar, will lodge a complaint with the police


    प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवण्यात आले आहे. महापौर पेडणेकर सध्या आशिष शेलार वादावरून चर्चेत आहेत. पेडणेकरांना यापूर्वीही २०२० मध्येही धमक्या आल्या होत्या. अज्ञाताने तेव्हा फोनवरून धमकी दिली होती.

    दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुधवारी रात्री भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. पेडणेकर यांनी शेलार यांच्याविरोधात दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.



    भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (अ) (दुहेरी अर्थाची टिप्पणी करणे) आणि 509 (महिलेच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद शब्द वापरणे) अंतर्गत शेलारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करणार आहेत. वरळी परिसरात झालेल्या सिलिंडर स्फोटप्रकरणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी बीएमसीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला होता. यादरम्यान त्यांनी वादग्रस्त विधाने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, शेलारांनी बीएमसीच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

    Letter threatening to kill Mumbai Mayor Kishori Pednekar, will lodge a complaint with the police

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ