• Download App
    स्कूल चले हम ! आता पहिली ते चौथीचे वर्ग होणार सुरू ; चाईल्ड टास्क फोर्सने दिला हिरवा कंदील|Let's go to school! Now the first to fourth classes begin; Child Task Force gives green light

    स्कूल चले हम ! आता पहिली ते चौथीचे वर्ग होणार सुरू ; चाईल्ड टास्क फोर्सने दिला हिरवा कंदील

    ग्रामीण भागांमध्ये पाचवी ते बारावी तर शहरांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरू झाले आहेत.Let’s go to school! Now the first to fourth classes begin; Child Task Force gives green light


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सध्या कोरोनाची रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे.त्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल केले जात आहेत.यामध्ये मग हॉटेल्स, थिएटर, मंदिर, सार्वजनिक ठिकाणे सगळी उघडण्यात आली.सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असून आता प्राथमिक शाळा सुरू होणार की नाही यावर चर्चा होणार की नाही

    याकडे सगळ्यांचं लक्ष लागल होत.ग्रामीण भागांमध्ये पाचवी ते बारावी तर शहरांमध्ये आठवी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरू झाले आहेत.दरम्यान राज्याच्या चाईल्ड टास्क फोर्सने पहिली ते चौथी सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दिला आहे.



    आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की , पहिली ते चौथी इयत्तेपर्यंतचे वर्ग सर्व अटीशर्तींसह सुरू करण्याची परवानगी चाईल्ड टास्क फोर्सने दिली आहे.यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे देखील टोपे यांनी सांगितले.

    राज्यात लहान मुलांच्या लसीकरणाला अजून सुरुवात झालेली नाही.शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांचे लसीकरण पूर्ण झाल्याने पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्यास हरकत नसावी असे देखील तज्ञांचे सांगितले. कोव्हॅक्सिन ही लस लहान मुलांना देता येऊ शकते असे तज्ञांचे मत आहे .केंद्र सरकारने परवानगी दिली तर राज्यात कोव्हॅक्सिन मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. परवानगी मिळताच लसीकरणाला सुरुवात करता येऊ शकते.

    Let’s go to school! Now the first to fourth classes begin; Child Task Force gives green light

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mazi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच ऑक्टोबरचा लाभ मिळणार; 410.30 कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता

    Nilesh Ghaiwal, : लंडनमध्ये नीलेश घायवळचा ठावठिकाणा सापडला; यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती

    Mumbai BMC : मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर; 11 नोव्हेंबरला सोडत, तर 28 तारखेला अंतिम आरक्षण