प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषद निवडणुकीचे मतदान दुपारी 2.00 वाजेपर्यंत पूर्ण झाले आहे. संध्याकाळी मतमोजणीनंतर जोरदार धक्के बसणार आहेत. हे कुणाला ते त्यानंतर ठरणार आहे, पण त्याआधी सर्वपक्षीय नेते एकमेकांना टक्के टोणपे देऊन घेत आहेत. Legislative Council: Shocks after counting of votes in the evening
अमोल मिटकरी, दिपाली सय्यद, संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतून टक्क्या टोणप्यांच्या तोफा सांभाळल्या आहेत, तर भाजपकडून अनिल बोंडे यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत.
निकालानंतर भाजपचा सत्तेची मस्ती आणि माज उतरेल, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. तर राज साहेब लवकर बरे व्हा. विधान परिषद निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस एकटे पडतील, असे खोचक खर्च ट्विट दीपाली सय्यदने केले आहे.
मात्र अनिल बोंडे यांनी त्यावर कडी करून महाविकास आघाडीला विशेषतः शिवसेनेला टोले हाणला आहेत. वेळ आली होती भाई किंवा भाऊ वर. पण बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा असे ट्विट त्यांनी सकाळीच केले होते. पण नंतर त्याच्या पुढे जाऊन मावळा गेला तरी चालेल आपला कावळा वाचला पाहिजे, असा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
निकाल काहीही लागो शिवसेनेचा उमेदवार पडणार असे रवी राणा म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर दबाव आणायचा खूप प्रयत्न केला. परंतु मी मतदान करण्यात यशस्वी झालो आहे निकाल काहीही लागला तरी शिवसेनेचा उमेदवार पडणार आहे, असे भाकीत रवी राणा यांनी वर्तवले आहे.
विधान परिषद निवडणुकीनंतर राज्याचे राजकीय भवितव्य बदलण्याची शक्यता आहे त्यापूर्वी दोन्ही बाजूंनी एकमेकांना दिलेल्या टक्क्या टोणप्यांमुळे महाराष्ट्राच्या जनतेची करमणूक होत आहे.
Legislative Council: Shocks after counting of votes in the evening
महत्वाच्या बातम्या
- अग्निपथ हवाई दल : अग्निवीरांना 1 कोटींचा विमा, कॅटिंग सुविधा, 30 सुट्यांसह अनेक सवलतींचा फायदा!!
- विधान परिषद : काँग्रेस धोक्यात, पण माध्यमांनी लावली अजितदादा – फडणवीसांमध्ये चाणक्याची लढाई!!
- राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना संदेश : अग्निवीरमुळे तरुणाई नाराज, रस्त्यावर आंदोलन सुरू, वाढदिवस साजरा करू नका
- Agnipath Scheme : सैन्याची तयारी 1989 पासून, अंमलबजावणी 2022 मध्ये; गैरसमज घालविण्यास प्राधान्य!!