प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येच मतभेदाचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची विधान सभेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण असतानाच आता राष्ट्रवादीमध्येही यावरून दोन मतभेद असल्याचे समोर येत आहे. Legislative Council Opposition Leader: Ajitdar’s support for Shiv Sena, Jayant Patal’s opposition!!
काँग्रेससोबतच राष्ट्रवादीला देखील विचारात न घेता शिवसेनेने परस्पर याबाबतचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे, पण दुसरीकडे विधानसभेतले विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मात्र शिवसेनेच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
जयंत पाटील नाराज
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी दावा सांगितला होता. असे असताना उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. त्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील आपला विरोध दर्शवला आहे. विरोधी पक्षनेत्याची निवड करताना शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला देखील विश्वासात घेतले नाही. तिन्ही पक्षांनी एकत्र मिळून चर्चा केली असती तर महाविकास आघाडीसाठी ते चांगले झाले असते, असे जयंत पाटील यांनी सांगितले. पण दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र शिवसेनेच्या या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.
– काय म्हणाले अजितदादा?
ज्याचे सभागृहात संख्याबळ अधिक असते त्याचीच निवड विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी करण्यात येते. आता विधान परिषदेत शिवसेनेचे 12 आमदार आहेत तसेच त्यांना एका अपक्ष सदस्यांचे समर्थन आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे विधान परिषदेत प्रत्येकी 10 सदस्य आहेत. यामुळे शिवसेनेने दानवे यांच्या केलेल्या नियुक्तीत काहीही गैर नसून आपला शिवसेनेला पाठिंबा असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. यावर आता वाद घालण्यात अर्थ नसल्याचेही अजित पवार यांनी सांगत या नाराजी नाट्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Legislative Council Opposition Leader: Ajitdar’s support for Shiv Sena, Jayant Patal’s opposition!!
महत्वाच्या बातम्या
- हर घर तिरंगा मोहिमेवर वरुण गांधींचे सरकारवर टीकास्त्र ; म्हणाले- तिरंग्याच्या किमतीवर गरिबांच्या तोंडचा घास हिरावणे लज्जास्पद
- जगात शांततेसाठी मोदींच्या नावाचा प्रस्ताव : मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले- युद्ध रोखण्यासाठी आयोग बनवावा, यात पोप फ्रान्सिसही असावेत
- पावसाळी अधिवेशनात सहा दिवस कामकाज, अधिवेशनाला 17 ऑगस्टपासून सुरुवात
- Azadi Ka Amrit Mahostav : स्वतंत्र भारताला अर्थमंत्री आणि कायदे पंडित शिक्षणमंत्री देणारे लोकमान्य टिळक!!