विशेष प्रतिनिधी
मुंबई : Technical education institutes भारतीय तंत्रज्ञान संस्थांना (IITs) देशातील सर्वोत्तम आणि जागतिक दर्जाच्या STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) शिक्षण केंद्रांच्या रूपात पाहिलं जातं. या संस्थांनी शेकडो अभियंते, शास्त्रज्ञ, संशोधक घडवले, जे आज भारताची आणि जगाची प्रगती घडवत आहेत. पण या यशस्वी तांत्रिक शिक्षणाच्या संस्थांमध्ये डाव्या विचारसरणीचा शिरकाव झाला आहे, असे ओपी इंडिया या संकेतस्थळाने उघडकीस आणले आहे.Technical education institutes
आयआयटी मुंबईच्या अशंक देसाई सेंटर फॉर पॉलिसी स्टडीजमधील सहाय्यक प्राध्यापक अनुपम गुहा यांचं नाव सध्या चर्चेत आहे. एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता), धोरण अभ्यास आणि कामगारांच्या भविष्यासंबंधी विषयांवर ते शिक्षण देतात, पण त्यांच्या सोशल मिडिया पोस्टमधून ते एका ठराविक राजकीय विचारधारेचे प्रचारक असल्याचं वारंवार समोर येत असल्याचा आरोप केला जात आहे.
त्यांनी नुकत्याच एका ट्वीटमध्ये एमआयटी मधील विद्यार्थिनी मेघा वेंमुरी हिचं इस्रायलविरोधी वक्तव्य करणं ‘धाडसी’ असल्याचं म्हटलं. स्वतः शिक्षक असूनही त्यांनी सार्वजनिकरित्या सांगितलं की, “माझ्यात इतकं धाडस नव्हतं.” हे वक्तव्य म्हणजे शिक्षणसंस्थांमधील राजकीय पक्षपातीपणाचं एक उदाहरण मानलं जात आहे.
याआधीही त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणं हा घटनात्मक दृष्टिकोनातून अवैध असल्याचं मत मांडणाऱ्या लेखाला पाठिंबा दिला होता. भारतीय संसदेने कायदेशीरपणे घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात अशा मतप्रदर्शनामुळे ते वादात सापडले होते.
स्टरलाइट कॉपर कंपनीच्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनात मरण पावलेल्यांना त्यांनी ‘हुतात्मे’ म्हटले आणि “भांडवलशाही ही राज्य दडपशाहीशिवाय चालू शकत नाही,” असं ट्विट केलं होतं. तसेच, CAA कायद्याच्या विरोधात त्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचं खुलेआम आवाहन केलं होतं.
‘टुकडे टुकडे गँग’ या शब्दप्रयोगालाही त्यांनी ‘स्टोकास्टिक टेररिझम’ म्हटलं आणि तो वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी केली. ही भाषा शिक्षकाची कमी आणि एका राजकीय प्रचारकाची अधिक वाटते, असं मत सोशल मीडियावर व्यक्त केलं जात आहे.
आपल्याच मतप्रवाहाच्या विरोधात असणाऱ्यांविषयी त्यांनी “मी कम्युनिस्ट आहे आणि मला कोण काय म्हणतं याची पर्वा नाही” अशा थेट भाषेत वक्तव्य केलं आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, प्रश्न निर्माण होतो की देशाच्या तांत्रिक भविष्याची उभारणी करणाऱ्या संस्थांमध्ये, एकतर्फी राजकीय विचारधारा आणि राष्ट्रविरोधी प्रवृत्तींचं समर्थन कसं सहन केलं जाऊ शकतं?
Left-wing ideology intrusion into technical education institutes like IIT? IIT Bombay professor Anupam Guha in the middle of controversy
महत्वाच्या बातम्या
- Thackrey – Pawar : ठाकरे बंधू आणि पवार काका – पुतण्याला भाजपच्या ताकदीची भीती; त्याहीपेक्षा दोन्ही कडच्या नेत्यांना एकत्र येण्याची धास्ती!!
- Ek Peed Maa Ke Naam : एक पेड मॉं के नाम मोहिमेत महाराष्ट्राची चांगली कामगिरी; आता हरित महाराष्ट्रासाठी 10 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट!!
- सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??
- Kamal Haasan : कन्नड भाषा वादावर कमल हसन यांनी माफी मागण्यास दिला नकार, म्हणाले..