प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेत आधीच गळती सुरू आहे. 40 आमदार, 12 खासदार शेकडो नगरसेवक शिवसेनेतून बाहेर गेले आहेत. त्यात आता शिस्तगंगाच्या नावाखाली शिवसेनेतून हकालपट्टीचा सिलसिलाही सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातून आमदार, खासदार आणि नगरसेवक आधीच शिंदे गटात पोहोचले आहेत. उदय सामंतांची रत्नागिरी देखील तशी तयारी सुरू आहे. मराठवाड्यात संजय शिरसाट, अब्दुल सत्तार यांनी मेळावा घेऊन सुरुवात केली आहे. त्यात आता स्वतः उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन अनेक नेत्यांची हकालपट्टी सुरू केली आहे. यामागे ठाकरे गट बळकटीचे कारण देण्यात येत आहे.Leaks already in Shiv Sena; There is a big stampede from the eviction; Way out for Vijay Shivtar
शिवसेनेतून नेते, पदाधिकाऱ्यांची गळती सुरुच आहे. शिवसेना फुटल्यानंतर, पक्ष बांधणी नव्याने करण्याचे प्रयोजन केलेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षविरोधी कारवाया करणा-यांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. आता विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे आदेश जारी केले. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून ही माहिती देण्यात आली आहे.
शिंदे गटात सहभागी झाल्याने कारवाई
पक्षाच्या विरोधात काम केल्याने आणि पक्षाची शिस्त मोडल्यानंतर विजय शिवतारे यांना शिवसेनेने अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. विजय शिवतारे हे शिवसेनेचे माजी आमदार असून ते पुरंदर तालुक्यातून शिवसेनेचे प्रतिनिधित्व करत होते. विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिल्यानंतर, त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. विजय शिवतारे यांनी शिंदे गटात जात असल्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता.
Leaks already in Shiv Sena; There is a big stampede from the eviction; Way out for Vijay Shivtar
महत्वाच्या बातम्या
- ३६२ कोटींचे हेरॉईन जप्त; पंजाब कनेक्शन असल्याचा संशय
- PM मोदी आज बुंदेलखंड एक्स्प्रेस वेचे करणार उद्घाटन, दिल्ली ते चित्रकूटचे अंतर कमी होणार
- द फोकस एक्सप्लेनर : डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी पातळीवर घसरण, पुढे काय होणार? कोणत्या घटकांवर परिणाम होईल? वाचा सविस्तर…
- महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार का? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले हे उत्तर…