• Download App
    सामनाच्या संपादकांचे नेते आता सोनिया, राहूल आणि प्रियंका गांधी, देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊतांवर निशाणा|Leaders of Samna editors now Sonia, Rahul and Priyanka Gandhi, Devendra Fadnavis target Sanjay Raut

    सामनाच्या संपादकांचे नेते आता सोनिया, राहूल आणि प्रियंका गांधी, देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊतांवर निशाणा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सामनाच्या संपादकांचे नेते आता सोनिया, राहूल आणि प्रियंका गांधी झाले आहेत, असा निशाणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर साधला आहे. त्यांनी आपले केंद्रबिंदूच नव्हे तर नेतेही बदलले असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.Leaders of Samna editors now Sonia, Rahul and Priyanka Gandhi, Devendra Fadnavis target Sanjay Raut

    शिवसेनेने आपल्या मुखपत्रात भाजपविरुद्धच्या आघाडीत काँग्रेसला वगळता येणार नाही असे म्हटले आहे. त्यावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राउत यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. शिवसेनेच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया देताना फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, सामना आणि सामनाच्या संपादकाचे केंद्र बिंदूच बदलले आहे.



    अलिकडच्या काळात त्यांचे तीन नवीन नेते झाले आहेत. ते म्हणजे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आहेत. त्याचीच प्रचिती आता शिवसेनेच्या मुखपत्रातून दिसून येत आहे.फडणवीस म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे संप मिटवण्यासाठी आम्ही सरकारला विरोधी पक्ष म्हणून सहकार्य केले.

    आता महाविकास आघाडी सरकारने सुद्धा काही पावले पुढे यायला हवे. पण, ते यासाठी तयार दिसत नाहीत. राज्य सरकारमध्ये संवेदना राहिलेल्या नाहीत. त्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठला आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यापूर्वी एकदा विचार करावा. अजूनही वेळ गेलेली नाही.

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. परंतु, काँग्रेसला वेगळे पाडले. देशात यूपीए आघाडी अस्तित्वात राहिलेली नाही असे त्यांनी म्हटले होते. परंतु, शिवसेनेने आपल्या मुखपत्रात काँग्रेसला महत्व दिले.

    काँग्रेसला वेगळे करून नरेंद्र मोदींचा सामना करता येणार नाही. एवढेच नव्हे, तर काँग्रेसला राष्ट्रीय राजकारणातून दूर ठेवल्यास सद्यस्थितीच्या फासिस्ट राज प्रवृत्तीला बळ देणे असेच होईल. काँग्रेसचे ज्यांच्यासोबत मतभेद आहेत, ते ठेवून सुद्धा यूपीएची गाडी पुढे नेली जाऊ शकते असे सामनातून सांगण्यात आले आहे.

    Leaders of Samna editors now Sonia, Rahul and Priyanka Gandhi, Devendra Fadnavis target Sanjay Raut

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस