विशेष प्रतिनिधी
पुणे : Laxman Hake मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे त्यांच्या समर्थांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषण करणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. यातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करत थेट इशारा दिला आहे.Laxman Hake
लक्ष्मण हाके म्हणाले, मनोज जारांनेग पाटलांची मागणी बेकायदा आहे. शासनाने त्यांना फॅक्ट समजून सांगितले पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रात अराजकता निर्माण होऊ शकते, असा इशारा हाके यांनी दिला आहे. तसेच मराठा तेवढा मेळवावा ओबीसी मुळासकट संपवावा, असाच जरांगेंच्या मागणीला अर्थ होतो, असेही हाके यांनी म्हटले आहे.Laxman Hake
पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, ओबीसी जरांगेंच्या आंदोलनाला प्रति आंदोलन पुकारतील. त्यांची संख्या जेवढी आहे त्याच्या दहापट संख्या महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरलेली दिसेल, अशी घोषणाच हाके यांनी केली आहे. जरांगे कधी कोणाची स्तुती करतील आणि कोणाच्या रसदीवर आंदोलन उभे करतील याचा नेम नाही, असे हाके म्हणाले.
अजित पवारांच्या आमदारांनी जरांगेंना रसद पुरवली, जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांविरोधात खालच्या स्थरावर टीका करत आहेत, मात्र तरी देखील सत्तेतील माणसे जरांगे पाटलांना रसद पुरवत आहेत. ओबीसीच्या मंत्र्यांनी गट निर्माण करून मुख्यमंत्र्यांना बोलले पाहिजे, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील हे सध्या नारायणगाव येथे दाखल झाले असून 29 तारखेला मुंबईत धडकणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली होती, परंतु काल दिनांक 27 ऑगस्ट रोजी पोलिसांनी आझाद मैदानावर एक दिवसाची आंदोलनाची परवानगी दिली असल्याचे समोर आले होते. मात्र, मनोज जरांगे हे आंदोलनावर तसेच आझाद मैदानावर उपोषणावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Laxman Hake Warns Manoj Jarange Anarchy Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Cotton : कापड व्यापारी 31 डिसेंबरपर्यंत टॅरिफमुक्त कापूस आयात करू शकतील; वस्त्रोद्योग क्षेत्राला 50% अमेरिकन टॅरिफपासून वाचवण्याचा निर्णय
- Justice Nagaratna : न्यायमूर्ती नागरत्ना SCच्या कॉलेजियमशी असहमत; न्यायमूर्ती विपुल पंचोलींच्या SCत नियुक्तीवर आक्षेप
- जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनसाठी खानावळी; डॉ. मोहन भागवतांनी सांगितली त्यांची कहाणी!!
- Commonwealth Games : 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारत बोली लावणार; मंत्रिमंडळाची मंजुरी, अंतिम मुदत 31 ऑगस्ट