विशेष प्रतिनिधी
मुंबई : Laxman Hake ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली आहे. यापूर्वी देखील लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर शिवराळ भाषेत टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे सुरज चव्हाण यांनी लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा दिला होता. तर एका नेत्याने त्यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसला प्रत्युत्तर देताना लक्ष्मण हाके यांची पुन्हा जीभ घसरल्याचे समोर आले आहे.Laxman Hake
लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस आल्यानंतर त्याला उत्तर देताना लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांवर पुन्हा टीका केली आहे. ते म्हणाले, अजितदादा पवार यांना आम्ही महाजातीवादीच म्हणणार आणि त्याचा पश्चाताप आम्हाला अजिबात वाटत नाही. कारण, या अजितदादा पवार यांनी ओबीसींचे वसतीगृह नाकारले आहे. ओबीसींच्या पोरांना फेलोशिप नाकारली. शोषित, वंचितांना निधी नाकारला. हाच अजितदादा पवार आपल्या आजारी कारखान्यांसाठी आताच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये दोन हजार कोटीपेक्षा जास्त निधी मंजूर करून घेतो. ओबीसींचे भवितव्य असणाऱ्या ओबीसींच्या पोरांना शिष्यवृत्ती नाकारणाऱ्या अजितदादांना आम्ही हराXXX म्हणू नये, तर काय म्हणावे?
तुम्हाला तर दरोडेखोर म्हटले पाहिजे
पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, अजितदादा पवार हे काय तांदळासारखे आहेत का? अजितदादा पवार यांच्यावर 70 हजार कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप असताना तुम्ही काय हभप आहेत का? अजितदादा पवार तुम्ही साधू संत आहात का? तुम्ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहात. महाराष्ट्राच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा घालणारे तुम्ही आहात. त्यामुळे हराXXX हा शब्द खूप सौम्य आहे. तुम्हाला तर दरोडेखोर म्हटले पाहिजे.
होय मी हराXXX म्हटलो आहे. त्यांनी मला काय नोटीस पाठवली आहे, ते मी बघून घेईल आणि अशा जर नोटीसा तुम्ही मला पाठवणार असाल तर आयला मायला म्हणणारे तुम्ही, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अमृत पाजणारे तुम्ही, लाईट गेली तर पोरं होतात, असा शोध लावणारे तुम्ही मग तुम्हाला आम्ही काय म्हणायचे? हे आम्ही आगामी काळात निश्चितपणे तुम्हाला सांगू असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
Laxman Hake Calls Ajit Pawar ‘Maha-Jatiwadi,’ Accuses of Robbery
महत्वाच्या बातम्या
- UNESCO’s : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारतातील मराठा साम्राज्यातील लष्करी बांधणीच्या गडकिल्ल्यांचा समावेश
- Hassan : कर्नाटकच्या हासनमध्ये 40 दिवसांत हार्ट अटॅकने 30 जणांचा मृत्यू; लोकांमध्ये घबराट
- Ajit Doval अजित डोवालांनी पाश्चात्त्य माध्यमांच्या गळ्यात घातली त्यांचीच बेजबाबदारी; भारताच्या नुकसानीचे पुरावे मागून केली आरोपांची चाळणी!!
- Udaipur Files : कन्हैयालाल हत्याकांडावर बनलेल्या चित्रपटावर दिल्ली हायकोर्टाची बंदी; याचिकाकर्त्याने 2 दिवसांत केंद्राकडे आक्षेप नोंदवावा