• Download App
    Lavani Artist Surekha Punekar will join NCP; Entrance ceremony to be held in Mumbai

    राष्ट्रवादीत रंगणार लावणीचा फड, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर बांधणार हातावर घड्याळ; मुंबईत प्रवेश सोहळा

    वृत्तसंस्था

    मुंबई : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर लवकरच राजकीय मैदानात उतरणार आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत आता लावणीचा फड रंगणार हे नक्की झाले आहे. मुंबईत पक्ष प्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. Lavani Artist Surekha Punekar will join NCP; Entrance ceremony to be held in Mumbai

    सुरेखा पुणेकर या आज लावणी समाज्ञी आहेत . परंतु त्यांचा प्रवास अवघड होता. कलेची सेवा केल्यानंतर त्यांना आता जनतेची सेवा करण्यासाठी राजकारणात यायच आहे.
    अनेक वर्षापासून सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु आता त्या १६ सप्टेंबर रोजी मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्या राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार आहेत.



    पुणेकर यांनी यापूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून त्या राजकीय पक्षात प्रवेश करणार हे निश्चित झाले होते. दरम्यान, राज्यपालांकडे पाठवलेल्या नावांपैकी एका नावावर आक्षेप असल्यास सुरेखा पुणेकर यांना संधी मिळू शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

    कोण आहेत सुरेखा पुणेकर?

    सुरेखा पुणेकर या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी आहेत. लावणी या लोकनृत्याची ओळख नवीन पिढीला करून देण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी ८व्या वर्षांपासून लावणी आत्मसात केली. तेव्हापासूनच लावणी व सुरेखा पुणेकर हे दोन समानार्थी शब्द झाले. त्यांच्या कलेचे कौतुक सगळीकडे होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुरेखा पुणेकर यांना काँग्रेसकडून तिकीट मिळेल, असे बोलले जात होते. परंतु काँग्रेसने त्यांना तिकीट नाकारले होते.

    अतिशय गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हमालीचे काम करत असत. अनेकदा त्यांच्या घरात खायला देखील काहीही नसायचे. पण वाईट परिस्थितीवर मात करून त्यांनी यश मिळवले आहे. त्यांना एकदा बिग बॉसच्या घरात राहण्याची संधी मिळाली होती.

    Lavani Artist Surekha Punekar will join NCP; Entrance ceremony to be held in Mumbai

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस