• Download App
    विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कोर्सेसचा शुभारंभ आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन Launching of free courses and organizing various programs on the occasion of Vijayatai Rahatkars birthday

    विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कोर्सेसचा शुभारंभ आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन

    विजयाताई रहाटकर यांची नुकतीच भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : भाजपा राष्ट्रीय सचिव आणि  ‘आनंदी एम्पॉवर फाउंडेशन’च्या अध्यक्षा, संस्थापक  विजयाताई रहाटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार, २१ ऑगस्ट रोजी  छत्रपती संभाजीनगर येथे  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Launching of free courses and organizing various programs on the occasion of Vijayatai Rahatkars birthday

    याशिवाय पाच मोफत कोर्सचा भव्य शुभारंभही होणार असून, या कार्यक्रमास मिस इंडिया  उपविजेत्या, मिस महाराष्ट्र आणि चार्टर्ड अकाउंटंट्स शेरॉन रॉड्रिजस या प्रमुख पाहुण्या असणार आहेत. यामध्ये वेबडिझाइनिंग, ग्राफिक डिझाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, स्पोकन इंग्लिश, ब्यूटीपार्लर यांचा समावेश आहे. तसेच विजयाताईंच्या  वाढदिवसानिमित्त सोमवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात  येणार असून, पर्यावरण मित्र,निवृत्त वन अधिकारी मनोहर महाडिक हे  प्रमुख पाहुणे असणार आहेत. तर   सायंकाळी ५ वाजता  पहिला मजला, मेफेअर टॉवरसमोर,  उल्कानगरी येथे  मोफत कोर्सेसच्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    विजयाताई रहाटकर यांची नुकतीच भाजपाच्या राष्ट्रीय सचिवपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे . त्यांच्याकडे आधी दमण दीव प्रभारी पदाची जबाबदारी होती. तेथे पंचायत, जिल्हा पंचायत तसेच स्थानिक निवडणुकांमध्ये वर्षानुवर्षी असलेली काँग्रेसची सत्ता भाजपने त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेचून आणली. त्यानंतर विजयाताई रहाटकरांकडे 200 विधानसभा मतदारसंघ असलेल्या राजस्थान सारख्या मोठ्या राज्याची जबाबदारी सहप्रभारी म्हणून भाजपने सोपविली आहे.

    Launching of free courses and organizing various programs on the occasion of Vijayatai Rahatkars birthday

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना