काही कर्मचारी हे विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे महामडंळाने निलबंनात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली.Latur: ST carrier finally withdraws suspension of female employee
विशेष प्रतिनिधी
लातूर : एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावं, या मागणीसाठी मागील एक महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे.दरम्यान परिवहन मंडळाने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करून संप मागे घेण्यास सांगितले होते.परंतु काही कर्मचारी हे विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
त्यामुळे महामडंळाने निलबंनात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली.याच निलंबनाच्या प्रक्रियेमध्ये एसटीदरम्यान महामंडळाने प्रसूती रजेवर असलेल्या महिला कंडक्टर सारिका कोद्रे-लाड यांचं निलंबन केलं.
गैरशिस्तपणाचा ठपका ठेवत एसटी महामंडळाने त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. दरम्यान महिला कंडक्टरचं निलंबन मागे घेण्यात आलं आहे.सारिका कोद्रे-लाड यांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई ही नजरचुकीने करण्यात आली होती, असं स्पष्टीकरण हे महामंडळाने दिलं आहे.
Latur: ST carrier finally withdraws suspension of female employee
महत्त्वाच्या बातम्या
- आंध्र प्रदेश, ओडिशाला धडकणार चक्रीवादळ जवाद सज्ज, १०० हून अधिक रेल्वे रद्द, पर्यटनस्थळांवर न जाण्याचा सल्ला
- बिहारमध्येही एमआयएमचा राष्ट्रद्रोही प्रचार, असुद्दीन ओेवेसीच्या आमदारांनी वंदे मातरम गाण्यास दिला नकार
- राहूल गांधींवर टीका केल्याने कॉँग्रेसचा तिळपापड, ममता बॅनर्जींवर केला हुकुमशाही मानसिकतेचा आरोप
- सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत मनिष तिवारी यांचा कॉँग्रेस नेतृत्वापुढे लोटांगणाचा प्रयत्न, म्हणजे पाकिस्तानवर कोणाताही परिणाम झाला नाही