ही घटना आज ( रविवारी 23 जाने ) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली आहे.Latur: 12th grade student stabbed to death in hospital
विशेष प्रतिनिधी
लातूर : लातूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.शहरातील विशाल नगर भागातील श्री साई मंदिर लगत भर रस्त्यावर इयत्ता बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोयत्याने सपासप वार करून विद्यार्थ्याचा खून करण्यात आला आहे.ही घटना आज ( रविवारी 23 जाने ) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली आहे.
मयत मुलाचे नाव राहुल सुरेश उजळंंबे (१९, रा. मोती नगर, लातूर) असे आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता.दरम्यान त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.तसेच घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत असून, एकाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लातूर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांनी सांगितले की , हा खून कोणत्या कारणासाठी घडला, याचाही पोलीस तपास करीत आहेत.
Latur : 12th grade student stabbed to death in hospital
महत्त्वाच्या बातम्या
- Punjab Election : पंजाब लोक काँग्रेसची 22 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कॅप्टन अमरिंदर सिंग पतियाळातून लढणार
- भाजपच्या अनेक नेत्यांनी फडकविले बंडाचे निशाण; ५९ उमेदवारांची यादी जाहीर , उत्तराखंडात दलबदलूंना प्राधान्य
- औरंगाबादमध्ये महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरुन राजकारण तापलं; राजपूत समाज झाला आक्रमक
- राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांचे ट्विटर अकाउंट हॅक, हॅकरने अरबीमध्ये केले ट्विट