• Download App
    दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नीला विधान परिषदेवर संधी द्यावी, संभाजीराजे छत्रपतींची मागणी|Late Vinayak Mete's wife should be given a chance in Legislative Council, Sambhaji Raje Chhatrapati's demand

    दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नीला विधान परिषदेवर संधी द्यावी, संभाजीराजे छत्रपतींची मागणी

    प्रतिनिधी

    बीड : शिवसंग्रामचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांनी मराठा समाजाच्या प्रश्नावर आयुष्यभर संघर्ष केला. मराठा समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांचा ते चेहरा होते. त्यांच्या पश्चात समाजाच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी व त्यांनी उभे केलेले संघटन पुढे नेण्यासाठी त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना विधान परिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.Late Vinayak Mete’s wife should be given a chance in Legislative Council, Sambhaji Raje Chhatrapati’s demand

    यासाठी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून शिवसंग्रामच्या शिष्टमंडळानेही त्यांची भेट घ्यावी. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.



    विनायक मेटे यांचे 14 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाती निधन झाले होते. रविवारी संभाजीराजे छत्रपती यांनी बीड येथे विनायक मेटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे, मुलगा आशितोष मेटे व बंधू रामहरी मेटे यांची उपस्थिती होती. माध्यमांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, विनायक मेटे यांनी मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्य वेचले. त्यांचे अकाली जाणे वेदनादायी आहे.

    मेटे कुटुंबाशी संवाद साधताना संभाजीराजे यांनी विनायक मेटेंशी असलेल्या जिव्हाळ्याचा संदर्भ देताना आपण कोणत्याही अडचणीत मेटे कुटुंबाच्या पाठीशी राहू, असे सांगितले.

    Late Vinayak Mete’s wife should be given a chance in Legislative Council, Sambhaji Raje Chhatrapati’s demand

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!