विशेष प्रतिनिधी
मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होऊन अस्थी सावडण्यापूर्वीच महाराष्ट्रात त्यांच्या स्मारकाविषयी राजकारण सुरू झाले असून भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जेथे लतादीदींचे अंत्यसंस्कार झाले, त्या शिवतीर्थावर लतादीदींचे स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. Latadidi’s memorial on Shivteertha: Demand of BJP MLA Ram Kadam; Sanjay Raut’s “different” reaction !!
लतादीदींचे मोठे स्मारक शिवतीर्थावर व्हावे, अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे असे राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.मात्र लतादीदींचे स्मारक उभारण्याच्या या मागणीवर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी लगेच वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लतादीदी महान गायिका होत्या. भारतरत्न होत्या. त्या काही राजकारणी नव्हत्या. त्यामुळे त्यांचे स्मारक उभे करणे एवढे सोपे नाही. यासाठी देशाला विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया म्हणजे स्मारकाला त्यांचा असलेला विरोध दर्शवते, अशा प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत. लतादीदी सामनातले आपले लेख वाचायच्या. काही आवडले किंवा आवडले नाही तरी आवर्जून फोन करून मला सांगायचा, अशी आठवण संजय राऊत यांनी सांगितली. मध्यंतरी अटल बिहारी वाजपेयी यांच्या संदर्भात मी लिहिलेल्या लेखावर लतादीदींनी अनुकूल प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मी देखील त्यांच्या तब्येतीची माहिती नेहमी घेत होतो, असे ते म्हणाले.
मात्र संजय राऊत यांनी लतादीदींचे स्मारक करणे सोपे नाही. देशाला त्याचा विचार करावा लागेल, ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रतिक्रियेवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.
Latadidi’s memorial on Shivteertha: Demand of BJP MLA Ram Kadam; Sanjay Raut’s “different” reaction !!
महत्त्वाच्या बातम्या
- केरळच्या महिलेने जिंकली कोट्यवधी रुपयांची लॉटरी; तब्बल ४४.७५ कोटींचा मिळाला फायदा
- कोकणातील दशावतारी नाट्यक्षेत्राचा आधारस्तंभ हरपला; सुधीर कलिंगण यांचे आजाराने निधन
- हुंडाईच्या पाकिस्तानी शाखेची मस्ती, स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार!! #Boycott hudai ट्रेंडनंतर हुंडाईच्या भारत शाखेकडून पाकिस्तानी शाखेचा निषेध!!
- भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या वन डे सामन्यात नामविले; एक हजारावा सामना पडला पदरात