विशेष प्रतिनिधी
मुंबई : लता मंगेशकर ‘आयसीयू’मध्येच आहेत, असे त्यांच्या डॉक्टरांनी शनिवारी सांगितले. त्यांची प्रकृती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत, असे लतादीदींच्या आरोग्याचे अपडेट शेअर करताना, ब्रीच कँडी हॉस्पिटलचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रतित समदानी सांगितले. Lata Mangeshkar still in ICU; Health Improvement
परंतु त्या आणखी किती दिवस हॉस्पिटलमध्ये असतील हे सांगणे कठीण आहे,असेही त्यांनी नमूद केले. जगप्रसिद्ध पार्श्वगायिका, भारतरत्न लता मंगेशकर, दीदींना सौम्य लक्षणांसह कोरोना झाला. व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली. तेव्हा पासून, 8 जानेवारी रोजी त्यांना दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले. तेव्हा पासून त्या आयसीयूमध्ये आहेत.