गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. लता मंगेशकर यांनी रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न पुरस्कार विजेत्या लता मंगेशकर या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Lata Mangeshkar BCCI did not have money for Team India after winning the 1983 World Cup, Lata had a free concert
विशेष प्रतिनिधी
मुंबई : गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. लता मंगेशकर यांनी रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न पुरस्कार विजेत्या लता मंगेशकर या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
लता दीदींनी भारतीय क्रिकेटसाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. 1983मध्ये भारतीय संघ चॅम्पियन झाला तेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) खेळाडूंना देण्यासाठी पैसे नव्हते. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयची आर्थिक स्थिती त्यावेळी अत्यंत बिकट होती. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे यांना खेळाडूंना पुरस्कार देण्याची इच्छा होती, मात्र पैशांअभावी ते रखडले होते.
या गंभीर परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी साळवे यांनी गानसरस्वती लता मंगेशकर यांची मदत घेतली. भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर लता मंगेशकर यांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. ही मैफल प्रचंड गाजली आणि 20 लाख रुपये जमा झाले. नंतर भारतीय संघातील सर्व सदस्यांना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.
‘भारत विश्वविजेता’ हे गाणे प्रसिद्ध झाले
या मैफलीत लता मंगेशकर यांनी अनेक गाणी गायली, पण ‘भारत विश्वविजेता’ या गाण्याला खूप दाद मिळाली. या गाण्याचे संगीत लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी दिले, तर त्याचे बोल प्रसिद्ध बॉलिवूड गीतकार ‘इंदिवर’ यांनी लिहिले आहेत. विशेष म्हणजे जेव्हा लता मंगेशकर स्टेजवर हे गाणे गात होत्या, तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडूही मागून लताजींच्या आवाजात स्वरात स्वर मिसळत होते.
या कॉन्सर्टसाठी लता मंगेशकर यांनी बीसीसीआयकडून कोणतेही शुल्क घेतले नाही. लता मंगेशकर यांचे हे योगदान बीसीसीआय आणि तत्कालीन खेळाडूंनी नेहमी लक्षात ठेवले. बीसीसीआयने तर लतादीदी हयात असेपर्यंत भारतातील प्रत्येक स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी एक जागा राखून ठेवली जाईल, असा प्रस्ताव दिला होता.
BCCIने केले चॅरिटी मॅचचे आयोजन
1983 च्या विजयानंतर 20 वर्षांनी 2003 मध्ये जेव्हा लता मंगेशकर यांना त्यांच्या हॉस्पिटलसाठी निधीची गरज होती, तेव्हा बीसीसीआय जुने कर्ज फेडण्यासाठी पुढे आली. बीसीसीआयने हॉस्पिटलसाठी निधी उभारण्यासाठी एक चॅरिटी मॅच आयोजित केली. हा चॅरिटी सामना 2003च्या विश्वचषकानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला होता, ज्यातून जमा झालेला पैसा मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेला होता. लताजींच्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बनवलेले दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर पुण्यात आहे.
Lata Mangeshkar BCCI did not have money for Team India after winning the 1983 World Cup, Lata had a free concert
महत्त्वाच्या बातम्या
- भारत बनला जगज्जेता, विश्वचषकमध्ये अंतिम सामन्यात इंग्लंडच्या संघांचा पराभव
- दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळी दाट धुके
- ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेर सुरक्षेत वाढ
- महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका, किरीट सोमय्या यांच्यावरील हल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची संतप्त प्रतिक्रिया
- संजय राऊत मित्र परिवाराचा १०० कोटी रुपयांचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा, किरीट सोमय्या यांचा आरोप