- लता मंगेशकर जवळपास महिनाभर आजारी होत्या. ८ जानेवारी रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच क्रँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
- लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनिया झाला होता. लता दीदींचे वय पाहता डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले. तेव्हापासून त्या संघर्ष करत होत्या.
- लता मंगेशकर हे जग सोडून गेल्या मात्र त्यांची गाणी लोकांच्या हृदयात सदैव जिवंत राहतील, कारण लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाच्या जादूने लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे जे कधीही पुसले जाऊ शकत नाही. lata mangeshakar passed away
विशेष प्रतिनिधी
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी- संगीत जगत- आणि संपूर्ण देशाला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली जी सांगताना अतीव दु:ख होत आहे. सर्वांच्या लाडक्या आणि भारताच्या स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाले. लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देश दुःखात आहे.
लता मंगेशकर यांचे संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. जे कधीच विसरता येणार नाही. लता मंगेशकर यांनी 78 वर्षांच्या कारकिर्दीत 25 हजार गाणी गायली. लतादीदींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्या तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या . याशिवाय त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि भारतरत्ननेही सन्मानित करण्यात आले होते. लता मंगेशकर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी काम करायला सुरुवात केली. ज्या वयात मुले खेळतात शिकतात त्या वयात लता मंगेशकर यांनी घराची जबाबदारी घेतली. आपल्या भावंडांच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांनी कधीही लग्न केले नाही.
लता मंगेशकर हे जग सोडून गेल्या असतील. पण त्यांन्नी दिलेला सदाबहार गाण्यांचा वारसा चाहत्यांसाठी आहे. लता दीदींच्या या गाण्यांनी त्यांना या जगात अजरामर केले…