• Download App
    लासलगाव समितीला अमावास्या पावली;आठ महिन्यामध्ये कांदा लिलावात २५० कोटीची उलाढाल। Lasalgaon committee gets turnover of Rs 250 crore in onion auction in eight months

    लासलगाव समितीला अमावास्या पावली;आठ महिन्यामध्ये कांदा लिलावात २५० कोटीची उलाढाल

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : गेल्या ७५ वर्षांपासून अमावास्येला बंद असलेले लासलगाव बाजार समितीचे कांदा लिलाव हे रूढी, परंपरा याला फाटा देत सुरू केल्याने जून महिन्यापासून कांदा लिलावाच्या उलाढालीत २५० कोटींची वाढ झाली आहे. Lasalgaon committee gets turnover of Rs 250 crore in onion auction in eight months

    लासलगाव बाजार समितीच्या प्रथम महिला सभापती सुवर्णा जगताप यांनी व्यापारी वर्गाशी समन्वय साधत, अमावास्या व शनिवारी कांदा लिलाव सुरू केले असल्याने बाजार समितीत १२ लाख क्विंटल कांदा आवक वाढली आहे.



    बाजार समितीच्या ७५ वर्षांच्या कालखंडात अमावास्येला कांदा, भुसार व तेलबिया या मालांचे लिलाव बंद असायचे. परंतु, शेतकरी बांधवांची कांदा विक्रीची निकड विचारात घेऊन व परिसरातील शेतकरी बांधवांच्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून अमावस्याच्या दिवशी बंद असलेले कांदा लिलाव हे सुरू झाल्याने बाजार समितीत गेल्या आठ महिन्यांमध्ये २५० कोटींची उलाढाल झाली आहे.

    Lasalgaon committee gets turnover of Rs 250 crore in onion auction in eight months

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    समाजात ज्ञानकेंद्रित शिक्षणाचा अभाव; शिक्षण व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक; भैय्याजी जोशींचे परखड मत

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- धर्मच मला व मोदींना चालवत आहे, जोपर्यंत धर्म भारताला मार्गदर्शन करेल, तोपर्यंत देश विश्वगुरू राहील