वृत्तसंस्था
पुणे : उत्तरेकडील राज्यांतून बटाट्याची मोठी आवक झाली आहे. त्यामुळे दर कमी झाले आहेत. तसेच कांदाही आवाक्यात आल्याने जनतेची चांदी झाली आहे. Large imports of potatoes from the northern states, rates fell; Relieves Consumers ; onion also became cheaper
उत्तरेकडील आग्रा, मध्यप्रदेश भागात बटाट्याची मोठी लागवड केली जाते. बटाट्यापाठोपाठ कांद्याच्या दरातही घट झाली आहे. शेतकऱ्यांकडून जुना कांदा राज्यातील घाऊक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. आवक वाढल्यामुळे कांदा-बटाटा स्वस्त झाला आहे. ग्राहकांनाही दिलासा मिळाला आहे. नवीन कांद्याचा हंगाम एक-दीड महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुना साठवणुकीतील कांदा बाजारात पाठविला आहे.
उत्तरेकडील राज्यातून मोठी आवक
उत्तरेकडील आग्रा, मध्यप्रदेश भागात बटाट्याची मोठी लागवड केली जाते. शेतकरी बटाटा शीतगृहात साठवितात. बटाटा साठवणुकीचे करार नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात संपतात. त्यानंतर नवीन बटाट्याचा हंगाम सुरू होतो. अशा परिस्थितीत बटाटा साठवणूक करणे अयोग्य ठरते. त्यामुळे उत्तरेकडील राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर बटाटा विक्रीस पाठवित आहेत. घाऊक बाजारात एक किलो बटाट्याला १० ते १३ रुपये असा दर मिळत आहे.
शेतकऱ्यांनाही फायदा
नवीन कांदा-बटाट्याचा हंगाम दोन- तीन महिन्यात सुरू होईल. त्यामुळे कांदा-बटाट्याची साठवण करणे परवडणार नाही. कांदा निर्यातीला फार चालना नाही. त्यामुळे जुना कांदा-बटाटा विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. आवक वाढल्यामुळे किरकोळ बाजारातील कांदा, बटाट्याचे दरही उतरले आहेत. घाऊक बाजारातील दरात मोठी घसरण नसल्याने शेतकऱ्यांनाही समाधानकारक दर मिळत आहेत.
पुणे जिल्हयातील शिरूर, खेड, जुन्नर, नाशिकमधील सिन्नर, संगमनेर भागातील शेतकरी कांदा चाळीत साठवितात. या साठवणुकीतील जुन्या कांद्याची आवक चांगली आवक बाजारात होत आहे. जुन्या कांद्याला परराज्यातून मागणी नाही. त्यामुळे कांद्याचे दर उतरले आहेत.
– रितेश पोमण, कांदा व्यापारी, मार्केटयार्ड
Large imports of potatoes from the northern states, rates fell; Relieves Consumers ; onion also became cheaper
महत्त्वाच्या बातम्या
- शशी थरुरना गाढव म्हटल्याबद्दल तेलंगण काँग्रेस प्रदेशाध्यक्षाकडून माफी
- काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल
- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चार धाम यात्रा आजपासून सुरु
- India Vaccination : कोरोना लसीकरणात भारताने मोडला चीनचा ऐतिहासिक विक्रम, रात्री साडे नऊपर्यंत 2.25 कोटी डोस दिले