• Download App
    Ladki Bahin Yojna : लाखो लाडक्या बहिणींनी शासनाला फसवल्यानंतर अजितदादांना आली जाग; नेमकी पात्र संख्या सांगण्यासाठी दिले आयकर विभागाला काम!!

    Ladki Bahin Yojna : लाखो लाडक्या बहिणींनी शासनाला फसवल्यानंतर अजितदादांना आली जाग; नेमकी पात्र संख्या सांगण्यासाठी दिले आयकर विभागाला काम!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या घाई गर्दीत लाडकी बहीण योजना अंमलात आणून महाराष्ट्रातल्या कोट्यावधी बहिणींना फडणवीस सरकारने पैसे वाटले पण काही लाख लाडक्या बहिणींनी सरकारला गंडवले. निकषात बसत नसताना लाडकी बहिणी योजनेचे अर्ज भरून शासनाकडून पैसे घेतले. लाखो बहिणींनी फसवल्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना जाग आली म्हणून लाडक्या बहिणींची नेमकी पात्र संख्या सांगण्याचे काम त्यांनी आयकर विभागाला दिले. ladki bahin yojna

    लाडक्या बहिणींच्या जवळपास 2 लाख अर्जांची छाननी केल्यानंतर बरेच धक्कादायक माहिती समोर आली. अनेक बहिणींनी आपले खोटे उत्पन्न राखून लाडक्या बहिणी योजनेचे पैसे स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले. पण आता अनेक बोगस लाडक्या बहिणींची पोलखोल होणार आहे. राज्यभरात नेमक्या लाडक्या बहिणी योजनेत पात्र महिलांची संख्या किती हे आता आयकर विभाग सरकारला सांगणार आहे. ही माहिती मिळवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारचा केंद्रशी संपर्क सुरू आहे. या माहितीवरून लाभार्थी महिलांची पडताळणी करून अडीच लाखांच्यावर ज्यांचे उत्पन्न आहे अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजना बंद केली जाणार आहे.



    आयकर विभाग देणार लाभार्थी महिलांचा डेटा

    महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेसाठी अपात्र असलेल्या 2200 हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असल्याचं सांगितलं होतं. लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील नियमित प्रक्रिया आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत पडताळणीची प्रक्रिया राबवली जात असल्याचं मंत्री अदिती तटकरे यांनी x माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं .या प्रक्रियेत जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर जवळपास 2282 सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याचं आढळून आलं . यानंतर अडीच लाखांच्यावर उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांची पडताळणी करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महिलांसाठी बंद केली जाणार आहे .आता राज्यभरात किती पात्र महिला आणि किती अपात्र महिला आहेत याची सगळी माहिती राज्य सरकारला आयकर विभाग देणार आहे . त्यामुळे एकूणच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत या डेटाची मदत होणार आहे .

    या योजनेत सुमारे दोन कोटी 65 लाख लाभार्थी महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होत आहेत. पण या योजनेच्या सर्व अटी व शर्ती बघितल्यास राज्यभरातून साधारण एक कोटी 20 लाख महिलाच योजनेसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे .

    कोणकोणत्या कारणांमुळे महिलांना अपात्र ठरवण्यात आलं?

    2.30 लाख महिला – संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी

    1.10 लाख महिला – वय 65 वर्षांहून अधिक असल्याने

    1.60 लाख महिला – चारचाकी वाहनं असल्यामुळे

    7.70 लाख महिला – नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असल्याने

    2,652 महिला – सरकारी सेवेत कार्यरत असल्याने

    लाडकी बहीण योजना

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी ऑगस्ट 2024 ला राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. 21 ते 65 वयोगटातील महिलांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना दरमहा 1500 रुपयांची मदत या योजनेतून देण्यात येते. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे उत्पन्न सामान्य मर्यादेपेक्षा जास्त असते, त्यांना या योजनेतून पैसे देणे अपात्र ठरते.

    ladki bahin yojna bogus beneficiaries to be exposed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    MHADA : मुंबईत पावसाळ्यापूर्वी ‘म्हाडा’चा मोठा निर्णय!

    Bakri Eid : बकरी ईदच्या आधी विहिंप, बजरंग दल सतर्क; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

    Dombivli rape : 15 वर्षाच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलले, डोंबिवलीतले धक्कादायक प्रकरण उघड; राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल!!