विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात 2289 महिला सरकारी कर्मचाऱ्यांचा लाडक्या बहिणींच्या निधीवर डल्ला, पात्र नसताना उपटला फायदा!!, हे सत्य आज उघड झाले. महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर दिले. त्या उत्तरातून महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणींच्या निधीवर डल्ला मारल्याचे उघडकीस आले.
महाराष्ट्रात दीड कोटींपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केले. त्यामुळे महायुती विक्रमी बहुमताने सत्तेवर आली. पण याच कालावधीत अनेक महिलांनी पात्र नसताना लाडकी बहीण योजनेचा लाभ उठविला. त्यावेळी सरकारने सुद्धा कुठलीही छाननी न करता लाडक्या बहिणी योजनेचे पैसे वाटले होते.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
पण सरकारी तिजोरीवर बोजा पडायला लागल्यावर सरकारने छाननी सुरू केली. त्यामध्ये त्यांना लाखो महिला अपात्र असताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले. सरकारने त्यांची खाती बंद करून टाकली. यामध्ये 2289 महिला सरकारी कर्मचारीही सामील झाल्याचे दिसून आले. या महिला सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती उत्तम असताना सुद्धा त्यांनी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरून पैसे घेतल्याचे आढळले. सरकारने या महिला सरकारी कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्या खात्यात पैसे भरणे बंद केले, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
पण या निमित्ताने महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या ढिसाळ कारभाराचा कसा लाभ उपटला, हे उघडकीस आले. अर्थात त्यांच्या खात्यात पैसे भरणे बंद झाले असले तरी प्रत्यक्षात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. सरकार कशी कारवाई करणार का?, हा खरा सवाल आहे.
Ladki bahin yojna 2289 women govt employee
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसचे गमावलेले “राजकीय शहाणपण” परत येणार कधी??; संघावर बंदी घालायची काँग्रेस नेत्यांची खुमखुमी संपणार कधी??
- Delhi High Court : लोकसभा सभागृहात उडी घेऊन खासदारांना घाबरविणे देशविरोधी नाही? दिल्ली उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
- राहुल गांधींच्या कामाचा लेखाजोखा; लोकसभेत तर बोलले कमीच, पण विरोधी पक्षनेत्यांच्या मांदियाळी तरी कुठे लागला दिवा??
- ठाकरे बंधू आणि भाजपच्या धुमश्चक्रीत काँग्रेस पडली बाजूला; पवारांच्या राष्ट्रवादीलाही कुणी विचारेना!!