विशेष प्रतिनिधी
जळगाव : लाडकी बहीण योजनेवरून कुणी म्हणाले की पैसे परत घेतले जातील, अरे वेड्यांनो भाऊबीज दिली, तर ती परत घेतली जात नाही. कुणाचा बाप आला तरी आमच्या सरकारची लाडकी योजना बंद करू शकणार नाही, अशा परखड शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी आणि विरोधकांमधल्या बडबोल्या आमदांना सुनावले. जळगावमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. Ladki Bahin Yojana
राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी अनेक खुसपटे काढली. ही योजना फक्त निवडणुकीपुरती असल्याची टीकाही केली. त्यातच महायुतीमधील आमदार रवी राणा आणि शिंदेंचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण देत, या योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत असे सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण निर्णय घेतला तर कुणाच्या पोटात दुखायला लागले. कुणी म्हणाला लाच देताय का??, कुणी म्हणाले मते खरेदी करताय. अरे नालायकांनो, कुणीही बहिणीचे प्रेम विकत घेता येत नाही. प्रसंगी त्या उपाशी राहतील मात्र भावाला जेऊ घालतील. कुणी म्हणालं की 1500 रुपये माघारी घेऊ. अरे वेड्यांनो, दिलेली भाऊबीज परत घेत नाहीत.
कुणाचा बाप आला तरी ही योजना बंद करू शकत नाही. कारण महिलांना सक्षम करण्याचा निर्णय आम्ही घेतला. येत्या काळात महिला सक्षम झाल्यानंतर महाराष्ट्र कधीच मागे पडणार नाही. मुख्यमंत्री महोदय, आपण योग्य निर्णय घेतला, कारण आमच्या महिला बचत गटाचा एक एक पैसा पैसा परत करतात. 25 तारखेला याच मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत.
31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलेल्या महिलांना जुलै, ऑगस्ट महिन्यांचे पैसे आम्ही देऊ. कारण महिलांच्या हाती पैसे पडले की ते योग्य ठिकाणी कारणी लागतात. मात्र पुरुषांच्या हातात पैसे पडले तर ते कुठे जातील हे सांगता येतं नाही.
मतं जर दिली नाही तर पैसे परत घेतले जातील असं महायुतीमध्ये असलेले आमदार रवी राणा यांनी गंमतीने म्हटले होते, तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी डिसेंबरनंतर या योजनेतून विरोधकांची नावे काढून टाकली जातील असे वक्तव्य केले होते, मात्र त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यासकट सगळ्या विरोधकांना सुनावले.
Ladki Bahin Yojana not stopped
महत्वाच्या बातम्या
- मविआचा मुख्यमंत्री कोण??; पृथ्वीराज बाबांचे मत दुर्लक्षित करण्यासारखे नाही; पवारांची कबुली!!; पण ती का द्यावी लागली??
- Mayawati : मायावतींनी बांगलादेशातील हिंदूंसाठी उठवला आवाज, मोदी सरकारकडे केली ही मागणी
- chandrashekar Bawankule : पराभवाच्या भीतीपोटी लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंची टीका; बावनकुळेंचा हल्लाबोल!!
- Ashish shelar : मनमोहनसिंग सरकारमध्ये पवार असताना त्यांनी आरक्षण मर्यादा 50 % वर का नेली नाही??; आशिष शेलारांचा सवाल!!