• Download App
    Ladki Bahin Yojana डिसेंबर महिन्याच्या लाडकी बहिण योजनेच्या वितरणाची सुरुवात, आदिती तटकरे यांची माहिती

    डिसेंबर महिन्याच्या लाडकी बहिण योजनेच्या वितरणाची सुरुवात, आदिती तटकरे यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : डिसेंबर महिन्याच्या लाडकी बहिण योजनेच्या वितरणाची सुरुवात आजपासून होत आहे. आजचा हफ्ता वितरण करत असताना 2 कोटी 34 लाख महिलांचा समावेश असणार आहे , अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

    त्या म्हणाल्या, ज्या महिलांना आधार कार्ड सिडींग मुळे वंचित राहावं लागत होतं त्यांच्या आधार सिडिंग झालेल्या महिलांच्या खात्यात सुद्धा हे पैसे आज पासून मिळून जातील. येत्या चार ते पाच दिवसात टप्प्याटप्प्याने याच वितरण होऊन जाईल. 2 कोटी 34 लाख पुढच्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे

    तटकरे म्हणाल्या, लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ राज्याच्या तीन लाडक्या भावांमुळे मिळत आहे. लाडक्या बहिणी योजनेतून मिळालेल्या पैशाचा वापर कुटुंबासाठी आणि घरातील सुख-समृद्धीसाठी करण्यात यावा.

    दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात केली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे मिळणार आहे. 2100 रुपये मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

    2100 रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

    विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर महिन्यांच्या अंतिम महिन्याच्या आठवड्यात सर्व पैसे दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना लाभ मिळणार आहे. त्यानंतर उर्वरित महिलांना पैसे दिले जाणार आहे. योजनेसाठी लागणारा 3500 कोटी रुपयांची निधी वर्ग करण्यात आला आहे.

    Ladki Bahin Yojana for the month of December

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sudhir Mungantiwar, : मंत्री सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा- सुधीर मुनगंटीवार संतापले, घरकूल निधीवरूनही रोष

    NGT Halt Tapovan : तपोवन वृक्षतोडीला NGTचा ब्रेक; एकही झाड 15 जानेवारीपर्यंत तोडता येणार नाही

    Legislature Privilege : विधानमंडळ विशेषाधिकार समितीचा निर्णय- 2 आमदारांच्या कार्यकर्त्यांना विधिमंडळाकडून दोन दिवसांची कैद