• Download App
    Ladki Bahin Yojana: February Installment of ₹1500 Starts Crediting Today लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचे 1500 रुपये आजपासून जमा होणार; मंत्री अदिती तटकरेंची माहिती

    Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचे 1500 रुपये आजपासून जमा होणार; मंत्री अदिती तटकरेंची माहिती

    Ladki Bahin Yojana

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :Ladki Bahin Yojana   राज्यातील “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतील महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली असून ही रक्कम टप्प्याटप्प्याने खात्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.Ladki Bahin Yojana

    सरकारकडून ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने जमा केली जात आहे. यासाठी आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून २ ते ३ दिवसांच्या कालावधीत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे दिसू लागतील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.Ladki Bahin Yojana



    या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधारशी जोडलेले बँक खाते आणि ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या महिलांची ही प्रक्रिया पूर्ण आहे, त्यांनाच प्राधान्याने पैसे मिळत आहेत. काही महिलांच्या अर्जामध्ये किंवा माहितीमध्ये चुका असल्यामुळे त्यांचे पैसे अडकले होते. अशा महिलांना दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

    राज्य सरकारने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत दिली जाते. फेब्रुवारीचा हप्ता उशिरा मिळणार का अशी चिंता महिलांमध्ये होती, मात्र आता प्रत्यक्ष पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याने त्या चिंतेचा निरास झाला आहे.

    सरकारने महिलांना आवाहन केले आहे की, ज्यांनी अजून ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा पुढील हप्ते मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व लाभार्थींनी आपली कागदपत्रे आणि बँक तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी.

    Ladki Bahin Yojana: February Installment of ₹1500 Starts Crediting Today

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नाशिक फाटा ते खेड ८ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदा प्रक्रियेला गती!!

    Fadnavis Govt : फडणवीस सरकारचा 10 लाख कुटुंबाना दिलासा- सरकारी जमिनीवरील 2011 पर्यंतचे 500 चौरस फुटांचे घर नियमित होणार

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- व्हिडिओ जोडतोडीचा दावा केल्याने मंत्री झिरवाळ यांना तूर्तास संरक्षण; पडताळणीनंतरच राजीनाम्याचा निर्णय