• Download App
    Ladki Bahin Yojana मोठा दिलासा: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा

    मोठा दिलासा: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिलांची ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू असताना, अलिकडे काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती, महिलांनी उपस्थित केलेल्या अडचणी लक्षात घेता. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली ई-केवायसी करण्याची दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्धारित अंतिम मुदत वाढवून आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याची माहिती राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. Ladki Bahin Yojana

    अलीकडील नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे संबंधित आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होणे अशक्य झाले आहे. अशा परिस्थितीत अपूर्ण ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देणे आवश्यक आहे. Ladki Bahin Yojana



    तसेच, ज्या पात्र महिलांच्या पती किंवा वडील हयात नाहीत किंवा ज्या महिला घटस्फोटित आहेत अशांनी स्वतःची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचा आदेश यांची सत्यप्रत सादर करणे आवश्यक राहील.

    या अनुषंगाने पात्र महिलांना न्याय मिळावा आणि कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे योजनेपासून वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका आहे. याकरिता माननीय मुख्यमंत्री व दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हिताचे भान राखत ई-केवायसी प्रक्रियेस ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विस्तारित कालावधीत लाभार्थींनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी केले आहे.

    Ladki Bahin Yojana E-KYC Extension December 31 Aditi Tatkare Photos Videos Announcement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    येवल्यात भुजबळांशी युती, बारामतीत अजितदादांशी फाईट; भाजपने केली राष्ट्रवादीची हवा टाईट!!

    Shashi Tharoor : थरूर म्हणाले- 1989-90 मध्ये काश्मीरातून दहशतवाद सुरू झाला; आता दिल्ली-मुंबईपर्यंत पसरला

    Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा- हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसली; स्थानिकच्या निवडणुकांतही ‘माती’ होण्याचे भाकीत