विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ladki Bahin Yojana “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील महिलांना डिसेंबरचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने ३९३.२५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पात्र महिला लाभार्थींना डिसेंबर २०२५ चा लाभ मतदानापूर्वीच खात्यात जमा होणार आहे. तसेच तांत्रिक चुकांमुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासून अडकलेले हप्तेही पडताळणीनंतर मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.Ladki Bahin Yojana
१ जानेवारीला लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबरचा १५०० हजार लाभ देण्यात आला होता. डिसेंबरचा लाभ मकरसंक्रातीला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र १५ जानेवारीला महापालिकेच्या निवडणुका असल्याने विरोधी पक्षांनी हरकत घेतली हेाती. त्यामुळे डिसेंबरचा लाभ थांबवण्यात आला होता. आता ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानापूर्वीच बहिणींच्या खात्यात प्रत्येकी १,५०० रुपये जमा होणार आहेत. सामाजिक न्याय विभागाचा हा निधी प्रामुख्याने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.Ladki Bahin Yojana
महिलांचे आर्थिक स्वावलंबन, आरोग्य व पोषणासाठी योजना
महाराष्ट्र राज्य सरकारने २८ जून २०२४ रोजी सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती. राज्यातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन, आरोग्य आणि पोषण यामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही योजना १ जुलै २०२४ पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. विशेष म्हणजे, जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता (३००० रुपये) रक्षाबंधनाच्या निमित्ताने ऑगस्टमध्ये महिलांच्या खात्यात जमा करून या योजनेचा प्रत्यक्ष शुभारंभ झाला. मात्र, आता योजनेत अडचणी येत आहेत.
ई-केवायसी अर्जामध्ये कुटुंबातील कुणी सरकारी नोकरीत नाही ना, असा प्रश्न विचारण्यात आला होता. नकारात्मक पद्धतीने हा प्रश्न विचारण्यात आल्याने अनेक महिलांचा गोंधळ झाला. अनेक महिलांनी चुकीची माहिती नोंदवल्याने त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या नातेवाईक असल्याचे सिस्टिममध्ये दिसून आले. परिणामी त्यांची पात्रता तात्पुरती रद्द झाली आहे. त्यामुळे महिलांचे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे हप्ते अडकून पडले आहेत. तांत्रिक कारणाचा फटका सुमारे २४ लाख महिलांना सहन करावा लागला आहे. मात्र, आता अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी सुरू करण्यात आली असून, पात्र महिलांचे अडकलेले हप्ते युद्धपातळीवर जमा केले जाणार आहेत.
केवायसी चुकलेल्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी
काही कारणास्तव ई-केवायसी करताना महिलांनी चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. लवकरचद याची तपासणी होणार आहे. – अदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री
Ladki Bahin Yojana: 393 Crore Distributed; December Installment Before ZP Elections
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दावोस मध्ये जाऊन केले काय??; कुठल्या कंपन्यांशी केले करार??; वाचा सविस्तर यादी!!
- Asim Munir : आसिम मुनीर म्हणाले-पाकिस्तान निर्मितीचा उद्देश पूर्ण होणार आहे; इस्लामी देशांमध्ये याचा विशेष दर्जा, महत्त्व आता आणखी वाढेल
- Karnataka : कर्नाटकचे डीजीपी स्तराचे अधिकारी रामचंद्र राव निलंबित; अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई
- Assam Violence : आसाममध्ये जमावाने घरे-चौकी पेटवली, महामार्ग जाम; मध्यरात्री मॉब लिंचिंगमध्ये एकाचा मृत्यू झाला होता