विशेष प्रतिनिधी
मुंबई : Maharashtra महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची जागा अद्यापही रिकामीच असल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या विधानसभेतील स्वागत सोहळ्याच्या दिवशीच विरोधकांनी लोकशाहीच्या मूल्यांचा आणि परंपरेचा मुद्दा उपस्थित करत सभागृहात गोंधळ घातला. त्यांनी हे प्रकरण केवळ राजकीयच नव्हे तर लोकशाहीच्या प्रतिष्ठेशी निगडित असल्याचा आरोप करत कामकाजावर बहिष्कार टाकला.Maharashtra
आज सकाळी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षातील आमदारांनी विरोधी पक्षनेतेपद रिकामे राहणे हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे असल्याचे . “देशाचे सरन्यायाधीश आज विधानसभेत येणार असताना विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची रिकामी असणे हे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेस धरुन नाही,” असे भास्कर जाधव यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावर उत्तर देताना स्पष्ट केले की, विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीचा संपूर्ण अधिकार त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी यासंदर्भात आवश्यक चर्चा व विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला आहे. “मी सर्व कायदेशीर तरतुदी, प्रथा आणि परंपरांचा विचार करून लवकरच निर्णय घेईन,” असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यांनी विरोधकांच्या मागणीबाबत अनौपचारिक बैठकीत आधीच चर्चा झाल्याचेही सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या विषयावर भूमिका घेत शांततेचे आवाहन केले. “भास्करराव जाधव जो मुद्दा मांडत आहेत, तो योग्यच आहे. मात्र आजचा दिवस न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या सत्काराचा आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाला कुठलाही गोंधळ नको,” असे सांगत त्यांनी पहिले अभिनंदनपर प्रस्ताव सादर करून नंतर योग्य वेळी चर्चा होईल असे सूचित केले.
भास्कर जाधव यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, “आम्ही अध्यक्ष महोदयांना भेटलो, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले, पण अद्याप निर्णय घेतलेला नाही. आम्हाला वाद घालायचा नाही, फक्त लोकशाही मार्गाने विषय सोडवायचा आहे.” ते पुढे म्हणाले, “आज सरन्यायाधीशांना विधानसभेत पाहून आम्हाला सांगावे लागेल की, इथे लोकशाही पायदळी तुडवली जाते.”
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जयंत पाटील यांनीदेखील यावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, “इतक्या मोठ्या व्यक्तींचे स्वागत करत असताना विधानसभेत विरोधी पक्ष नेतेच नाहीत, ही बाब लोकशाहीला शोभणारी नाही. तातडीने यावर निर्णय व्हावा,” अशी त्यांनी अध्यक्षांकडे मागणी केली.
अध्यक्ष नार्वेकर यांनी पुन्हा एकदा निर्णय लवकरच घेण्याचे आश्वासन दिले असले तरी, विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत आपला विरोध नोंदवला. अभिनंदनपर प्रस्ताव सादर झाल्यानंतरही भास्कर जाधव यांनी पुन्हा मुद्दा उपस्थित केला. यावर अध्यक्षांनी पुन्हा लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
Lack of opposition leader means stifling democracy, opposition boycotts proceedings by creating ruckus in the assembly
महत्वाच्या बातम्या
- Trump Extends Tariff ट्रम्प यांनी टॅरिफची डेडलाइन 1 ऑगस्टपर्यंत वाढवली; जपान-दक्षिण कोरियावर प्रत्येकी 25% कर लादला
- Tejaswi Yadav : बिहारमधील जंगलराजची आठवण, तेजस्वी यादव यांच्याकडून मुस्लिम तृष्टीकरणासाठी गुंडांचे समर्थन
- Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले- ग्रामीण भागाचा विकास-रोजगार निर्मिती हाच आपल्या अर्थव्यवस्थेचा खरा पाया असावा
- हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र, संघाच्या प्रतिक्रियेवरून वेगळाच narrative set करायचा मराठी माध्यमांचा प्रयत्न!!