• Download App
    "मी" ला "आम्ही" करणारे कुटुंब : सांस्कृतिक वार्तापत्राच्या "कुटुंब" दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन kutumb publication of the Diwali issue

    “मी” ला “आम्ही” करणारे कुटुंब : सांस्कृतिक वार्तापत्राच्या “कुटुंब” दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन

    प्रतिनिधी

    पुणे : प्रत्येकाच्या आयुष्याच्या टप्प्यात विविध कुटुंबांचा सहवास मिळतो. या कुटुंबातून मिळालेला संस्कार मोलाचा असतो. तो जपायला आणि पुढच्या पिढीकडे द्यायला हवा अशा आशयाचे विचार प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक योगेश सोमण यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक वार्तापत्राच्या “मी’ ला आम्ही करणारे कुटुंब” या दिवाळी अंकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते शनिवारी, २८ ऑक्टोबर २०२३ रोजी कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमबीए हॉल येथे आज झाले. त्यावेळी ते बोलत होते. kutumb publication of the Diwali issue

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देशपांडे लॅन्डमार्कचे संचालक श्री. योगेश देशपांडे होते. व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार विभागाच्या जागरण पत्रिका आयामाचे प्रमुख अजय तेलंग आणि सांस्कृतिक वार्तापत्राच्या व्यवस्थापिका सुनीता पेंढारकर होते.

    दिवाळी अंकाचे अतिथी संपादक श्रीकांत काशीकर, ज्येष्ठ समुपदेशक डॉ. स्मिता कुलकर्णी, रा.स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत कुटुंब प्रबोधन गतिविधी विभागाचे संयोजक नरेश करपे, महानगर संयोजक धैर्यसिंह पाटील आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

    आपले आई-वडील- बहीण भाऊ हे आपले पहिले कुटुंब, त्यानंतर शाळा, महाविद्यालय, नोकरीचे ठिकाण आपल्या आयुष्यात अशा विविध टप्प्यांमध्ये अनेक कुटुंबांशी आपला संपर्क येतो. माझ्या महाविद्यालयीन जीवनात रा.स्व. संघ नावाचे व्यापक कुटुंबाशी संपर्क आला. तिथे मिळालेल्या विचारांची शिदोरी मोठी मोलाची आहे. यासंबंधीच्या आणि अशा अनेक आठवणी श्री. सोमण यांनी यावेळी सांगितल्या.

    त्याआधी व्यवस्थापिका सुनीता पेंढारकर यांनी सांस्कृतिक वार्तापत्राच्या वाटचालीबद्दल आणि दिवाळी अंकाच्या आयोजनाबद्दल माहिती दिली, तर योगेश देशपांडे यांनी भारतीय कुटुंब पद्धतीचे महत्व सांगताना कुटुंबाचा संस्कार महत्वाचा असून तो जपणे गरजेचे असल्याचे विचार व्यक्त केले.

    या कार्यक्रमात दिवाळी अंकाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रकाशन समारंभाला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. देवदत्त भिंगारकर यांनी सूत्रसंचालन केले, तर रजत जोशी यांनी आभार मानले.

    kutumb publication of the Diwali issue

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस