• Download App
    kothrud police harassment कोथरूड प्रकरणी महिला आयोग सक्रीय, बघा काय घेतला निर्णय | The Focus India

    kothrud police harassment कोथरूड प्रकरणी महिला आयोग सक्रीय, बघा काय घेतला निर्णय

    विशेष प्रतिनिधी 

    पुणे: पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित मुलींचा पोलिसांकडून शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची धक्कादायक बातमी रविवारी समोर आली. या घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही या प्रकरणी पुणे पोलिसांनी कोणताही गुन्हा नोंदवून घेतलेला नाही. यानंतर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. kothrud police harassment

    या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, यासाठी रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते रविवारी रात्री साडे तीन पर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयातच  ठाण मांडून होते. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी या सगळ्यांनी पहाटेपर्यंत चर्चा केली. परंतु तरीही पोलिसांनी या प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल करून घेतलेला नाही.



    छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या तपासासाठी या मुलींना कोथरूड पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. तेथील रिमांड रूममध्ये या मुलींचा पाच तास छळ करण्यात आल्याचा, तसेच पोलिसांकडून जातिवाचक शेरेबाजी करण्यात आल्याचा देखील आरोप आहे. पोलिसांनी आमच्याविषयी लैंगिक अपमान करणारी शेरेबाजी केल्याचा देखील दावा संबंधित मुलींनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलिस उपनिरीक्षक कामठे यांनी एका मुलीच्या अंगाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे देखील सांगितले जात आहे. kothrud police harassment

    चार ओळींचं पत्र देत गुन्हा दाखल करण्यास पोलिसांचा नकार

    पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करावा म्हणून रोहित पवारांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी रात्री साडेतीन पर्यंत चर्चा केली. परंतु पुणे पोलिसांनी रात्री साडेतीन वाजता चार ओळींचे पत्र देत गुन्हा दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. मुलींनी ज्याबाबत तक्रार दिली ती घटना एका खोलीत घडली आहे. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कोणतेही पुरावे नाही. मुलींनी जी ॲट्रोसिटीची तक्रार दाखल केलेली आहे त्यात काहीही तथ्य आढळेलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार नाही, असं पोलिसांनी या पत्रात म्हटले आहे. kothrud police harassment

    गुन्हा दाखल न केल्यामुळे प्रकाश आंबेडकर संतापले, थेट पोलिस अधिकाऱ्यालाच केला फोन

    पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवायला नकार दिल्यामुळे, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) चांगलेच संतापले. त्यांनी कदम नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याला याबद्दल फोनवर जाब विचारला. त्यावर एक-दोन दिवसात एफआयआर दाखल करून घेऊ असे अधिकाऱ्याने सांगितले. यावर कुठलातरी पोलीस औरंगाबादमधून येतो आणि हे सगळे कोणाच्या तरी घरात घुसतात. पोलिसांना कोणाच्या घरात घुसण्याचा परवाना दिलेला नाही ना? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला. तसेच या प्रकरणात तुम्ही आधी मुलींच्या एफ आय आर नोंदवून घ्या आणि मग त्याचा तपास करा असे देखील खडसावले. चौकशी होत राहील त्यामधून सत्य बाहेर येईल, पण एफ आय आर नोंदवायला पोलिसांचा इतका विरोध का? असा ठोस सवाल देखील यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुण्यातील अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव वाढला आहे. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतल्यामुळे सोमवारी दिवसभरात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार का, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

    kothrud police harassment Women’s Commission active in Kothrud case, see what decision was taken

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !