विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर घराघरामध्ये शिवसेना पोहोचवा, महायुतीच्या योजना जनतेपर्यंत न्या, येणारी कोणतीही निवडणूक आपण जिंकायचीच. भगवा फडकवण्याची, विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची सज्ज व्हा असे आवाहन आज रत्नागिरी जिल्हा #शिवसेना शाखेच्या वतीने शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना केले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव सेनेवर प्रहार केला, पण भाजपच्या मनसूब्यांना आव्हान दिले. कारण कोकणातले परंपरागत शिवसेनेचे वर्चस्व मोडून काढून तिथे भाजपचे वर्चस्व निर्माण करायची योजना भाजपने आखली आहे. नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांना त्यासाठीच भाजपने कामाला लावले आहे. Konkan
पण कोकणात शिवसैनिकांचा उत्साह पाहता महायुतीचा भगवा जिल्हा परिषदेवर फडकत राहील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पण त्याचवेळी कोकण हा शिवसेनेचा श्वास, शिवसेना कोकणी माणसाचा विश्वास” आहे, व्यासपीठावर बसलेले हे शिवसेनेचे वैभव आहे, तर समोर बसलेले शिवसैनिक हे आमचे ऐश्वर्य आहे. कोकणातील शिवसैनिकांनी बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर अपार प्रेम केले. १९९५ पासून रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे आणि पुढील ५६ वर्ष तो तसाच फडकत राहील, असे त्यांनी निक्षून सांगितले. यातून शिवसेनेच्या तयारीची चुणूक त्यांनी दाखवून दिली.
- नको नको ते खाल्ले, म्हणून कंबरडे मोडले आणि आता हंबरडा फोडू लागले; एकनाथ शिंदेंचा उद्धव सेनेवर निशाणा
– 1800 विकास प्रकल्पांची अंमलबजावणी
शिवसेना आणि एकनाथ शिंदे नेहमीच आपत्तीच्या काळात आघाडीवर राहिले आहेत. कोकणातील महापुराच्या संकटातही इथे येऊन मदतीचा हात पुढे केला. माझे हात देणारे असून घेणारे नाहीत, त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १८०० कोटींच्या विकास प्रकल्पांची अंमलबजावणी झाली असून सिंधुदुर्गलाही यापुढे भरीव निधी दिला जाईल, असे शिंदे यांनी यावेळी नमूद केले.
– गेमचेंजर प्रकल्प
मुंबई–सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड महामार्ग हा कोकणासाठी गेमचेंजर ठरणार आहे. या मार्गामुळे भविष्यात कोकणात रोजगाराच्या अनेक नवीन संधी प्राप्त होतील. कोकण कोस्टल हायवे मधील ९ खाडी पुलांचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे कोकणातील समुद्रकिनारे एकमेकांना जोडले जाऊन पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
या मेळाव्याला उद्योग तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, मुख्य प्रवक्ते आमदार दीपक केसरकर, मंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार निलेश राणे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार राजन साळवी, सदानंद चव्हाण, राजश्री अहिरराव, अण्णा कदम आदींसह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Konkan is the stronghold of Shiv Sena, take Shiv Sena to every household
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले- कुणी मिमिक्री केल्याने अंगाला भोकं पडत नाहीत, मी काम करणारा माणूस!
- नको नको ते खाल्ले, म्हणून कंबरडे मोडले आणि आता हंबरडा फोडू लागले; एकनाथ शिंदेंचा उद्धव सेनेवर निशाणा
- Supreme Court : दिल्ली-NCRमध्ये काही अटींसह17 ते 21 ऑक्टोबरपर्यंत ग्रीन फटाके फोडण्यास परवानगी; CJI म्हणाले- संतुलित दृष्टिकोन हवा
- Shehbaz Sharif : ट्रम्प यांचे कौतुक केल्याने पाक PM देशातच ट्रोल; लोक म्हणाले- शरीफ यांना खुशामतीबद्दल नोबेल द्या, आपले नेते इतके चापलूस का?