वृत्तसंस्था
कोल्हापूर : कोल्हापूरला शनिवारी रात्री भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. या भूकंपाची तीव्रता राष्ट्रीय भूमापन केंद्रावर ३.९ रिश्टर स्केल इतकी नोंदवली आहे. कोल्हापूरला रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी हा धक्का बसला. Kolhapur was shaken by a mild tremor; An atmosphere of fear among citizens; Saturday night sat down
कोल्हापूरपासून १९ किलोमीटर असलेल्या कळे गावाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. हा भूकंपाचा सौम्य धक्का असला तरी नागरिकांमध्ये घबराट पसरली. भूकंपानंतर नागरिक रात्री मोठ्याप्रमाणात घराबाहेर पडले. काही जण झोपेत होते. त्यामुळे त्यांची पळापळ झाली.
जनतेने सावधगिरी घेण्याची गरज
पश्चिम महाराष्ट्र हा तसा भूकंप्रवण भाग नाही. परंतु गेल्या काही वर्षात भूकंपाचे छोटे- मोठे धक्के जाणवत आहेत. विशेषतः कोयना, राधानगरी परिसरात यांचे केंद्रबिंदू आहेत. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर हे भूकंपाचे धक्के बसतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यायला हवी. पण, भविष्यात छोट्या भूकंपाचे रूपांतर मोठ्या भूकंपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ७ रिश्टर स्केल आणि त्या पेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप धोकादायक मानला जातो.
कालचा भूकंप हा ३.९ रिश्टर स्केलचा होता. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज तशी सध्या नाही. पण, त्याची तीव्रता वाढणारच नाही, अशा भ्रमात राहणे चुकीचे आहे. आपल्या सुरक्षेचा विचार जनतेने करावा. घटना घडून गेल्यावर ‘असे केले असते तर असे झाले असते.’ ‘ तसे केले तर असे झाले असते,’ अशी पोपटपंची करणारी मंडळी राज्यात आहेत. जर, तर याला घटनेनंतर कोणताच अर्थ नसतो. त्यामुळे ‘माझी सुरक्षा माझी जबाबदारी’ ,या प्रमाणे जनतेने वागले पाहिजे. नंतर तुमचा वाली कोणीही नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे. नुकत्याच सांगली, कोल्हापूर, चिपळूण आदी ठिकाणी आलेल्या महापुरानंतरचा कटू अनुभव तुमच्या पाठीशी आहेच.
Kolhapur was shaken by a mild tremor; An atmosphere of fear among citizens; Saturday night sat down
महत्त्वाच्या बातम्या
- दीड कोटी अफगाण नागरिकांना दोनवेळचे जेवण महाग; भीषण अन्नटंचाईने अफगणिस्तानमध्ये अन्नसंकट
- अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये सुमारे 600 तालिबान मारले गेले, प्रतिकार दलाचा दावा
- जेईई मेन्सच्या पेपरफुटीप्रकरणी एनएसयुआय करणार देशभर निदर्शने
- केंद्रीय कायदा मंत्री पहिल्यांदा भेटले तेव्हा सरन्यायाधीशांना वाटले कोणी कॉलेज तरुणच आहे!