विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापुरातील जिल्हा बँकेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची आज बिनविरोध निवड झाली आहे. या पदासाठी एकूण 9 अर्ज दाखल झाले होते. कागल तालुक्यातून मुश्रीफ यांचे स्वत:चे 4 आणि इतर 5 असे उमेदवार होते.
Kolhapur District Bank elections unopposed, Hasan Mushrif elected unopposed
अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस होता. पण आज या गटातून प्रताप दत्तात्रय पाटील, युवराज अर्जुनराव पाटील, दत्तात्रय तुकाराम खराडे, बाबासो हिंदुराव पाटील व धनंजय सदाशिवराव पाटील यांनी माघार घेतल्याने हसन मुश्रीफ बिनविरोध निवडून आले आहेत.
मागे पालकमंत्री सतेज पाटील देखील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गगनबावडा तालुका विकास संस्था गटातून बिनविरोध निवडून आले होते.
सत्तारूढ रूढ आघाडीचे पॅनेल ठरवण्यासाठी हसन मुश्रीफ आता व्यस्त आहेत. बिनविरोध निवडणूक झाल्यास समजताच कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून विजयी घोषणा दिल्या.
Kolhapur District Bank elections unopposed, Hasan Mushrif elected unopposed