Know Who Is Milind Teltumbde : गडचिरोलीतील ग्यारापट्टी जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या c60 युनिटने तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये कुप्रसिद्ध नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश असल्याचे समजत आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नक्षलवाद्यांची संपूर्ण ओळख पटल्याशिवाय नावे जाहीर करणार नाही, असे म्हटले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चकमकी दरम्यान गडचिरोली पोलिसांचे तीन जवान देखील यामध्ये जखमी झाले असून त्यांना घटनास्थळावरून हेलिकॉप्टरने तत्काळ नागपूरला हलवण्यात आले आहे. Know Who Is Milind Teltumbde Maoiest Leader report says He Is dead In encounter Today In Gadchiroli
प्रतिनिधी
गडचिरोली : गडचिरोलीतील ग्यारापट्टी जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या c60 युनिटने तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये कुप्रसिद्ध नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश असल्याचे समजत आहे. यासंदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नक्षलवाद्यांची संपूर्ण ओळख पटल्याशिवाय नावे जाहीर करणार नाही, असे म्हटले आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चकमकी दरम्यान गडचिरोली पोलिसांचे तीन जवान देखील यामध्ये जखमी झाले असून त्यांना घटनास्थळावरून हेलिकॉप्टरने तत्काळ नागपूरला हलवण्यात आले आहे.
कोण आहे मिलिंद तेलतुंबडे ऊर्फ सह्याद्री, ऊर्फ जोतिराव ऊर्फ श्रीनिवास?
यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावाचा रहिवासी असलेला मिलिंद तेलतुंबडे भीमा कोरेगाव प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा भाऊ आहे. त्याच्यावरदेखील या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. याशिवाय जांभुळखेडा स्फोटातदेखील त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. मिलिंद हा दीपक आणि सह्याद्री अशा विविध नावानी चळवळीत वावरतो. सोबतच दंडकारण्य केंद्रीय समितीचा तो सदस्य असून त्याच्यावर एक कोटीच्यावर बक्षीस आहे. कुप्रसिद्ध नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री उर्फ ज्योतिराव उर्फ श्रीनिवास आज महाराष्ट्र पोलीसांच्या एन्काऊंटर मध्ये ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. समाजाच्या काही घटकांमध्ये हिंसक विचारसरणी पेरून नक्षल भरती करण्यात त्याचा मोठा हात आहे. मिलिंद तेलतुंबडेचे एन्काऊंटर खरे असेल तर हा नक्षलवाद्यांना खूप मोठा झटका ठरणार आहे.
मिलिंद तेलतुंबडे कुख्यात शहरी नक्षलवादी आनंद तेलतुंबडे याचा भाऊ आहे. आनंद तेलतुंबडे एल्गार परिषद केस मध्ये UAPA कायद्यांतर्गत तुरुंगात आहे. त्याच्या सुटकेसाठी काही राजकीय नेते व त्याचे शहरी नक्षलवादी साथीदार अनेक प्रयत्न करत असून ते त्यात अद्याप यशस्वी ठरलेले नाहीत. मिलिंद तेलतुंबडेची पत्नी अँजेला सोनटक्के उर्फ राही उर्फ इश्कारा उर्फ सविता, उर्फ कविता ही बी.एस्सी.(मायक्रोबायॉलॉजी), एम्एस्सी. (झुऑलॉजी), एम्ए.(सोशॉलॉजी) व बी.एड. अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, माडिया, गोंडी भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात. तिच्यावर पोलिसांच्या खुनासाहित अनेक आरोप असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे.
मिलिंद तेलतुंबडे हा माओवादी सर्वोच्च सेंट्रल कमिटीचा सदस्य असून एल्गार परिषदेतील फरार आरोपी आहे. नक्षलवादी चळवळीत पश्चिम भारताचे काम ज्यात महाराष्ट्र मुख्य ह्याचा प्रभारी मिलिंदच आहे. जंगल आणि अर्बन ह्या क्षेत्रांतील दोन्हीवर कामाचा अधिकार याच्याकडे होता. एमएमसी म्हणजे महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेश तिन्ही राज्यांचा एमएमसी असा गुरीला झोन याने विकसित केला आहे. अॅंजेला सोनटक्के ही त्याची पत्नी. ही सुद्धा माओवादी म्हणून पकडली गेली होती. मिलिंद हा वणी – राजुरा परिसरात लहानाचा मोठा झालेला. शहरी भागात मावोवादी संघटनांमध्ये दलित समाजातील तरुणांना भरती करण्याचे विशेष लक्ष होते. शस्त्रास्त्रांची ट्रेनिंग देणे, ऑपरेशनला मान्यता देणे हेसुद्धा त्याचे काम होते. त्यामुळे ज्या शेकडो हत्या मागच्या दशकभरात पोलीस व सामान्य नागरिकांच्या माओवाद्यांच्या हातून झाल्या त्यासाठी मिलिंद तेलतुंबडेलाच जबाबदार मानले जाते. दरम्यान, पोलिसांनी अद्यापही मिलिंद तेलतुंबडेच्या मृत्यूला अधिकृत दुजोरा दिलेला नाही, परंतु लवकरच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Know Who Is Milind Teltumbde Maoiest Leader report says He Is dead In encounter Today In Gadchiroli
महत्त्वाच्या बातम्या
- मला गुजरातीपेक्षा हिंदी भाषा जास्त आवडते, आपल्याला आपली अधिकृत भाषा मजबूत करण्याची गरज आहे – अमित शहा
- MALIK VS WANKHEDE : …त्या कागदपत्रात नंतर अक्षरे घुसडल्याचे साध्या डोळ्यांनाही दिसतं ; नवाब मलिकांनी सोशल केलेल्या वानखेडेंच्या जन्मदाखल्यावर हायकोर्टाची फटकार
- अमरावती शहरात कलम १४४ लागू , जिल्हाधिकारी पवणीत कौर यांनी दिले जमावबंदीचे आदेश
- Delhi Lockdown:असह्य दिल्ली-परेशान दिल्लीकर! दिल्लीमध्ये प्रदूषणाचा लॉकडाऊन ! नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन…