• Download App
    E-pass : राज्यात पुन्हा एकदा ई-पासची सुरुवात, कशी मिळवाल परवानगी जाणून घ्या स्टेप बाय स्टेप... । Know How to Apply For Travel E-pass In Maharashtra during lockdown, read step by step process

    E-pass : राज्यात पुन्हा एकदा ई-पासची सुरुवात, कशी मिळवाल परवानगी? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप…

    How to Apply For Travel E-pass :  कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. यामुळे राज्य सरकारने दि. 22 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून 1 मेपर्यंत राज्यात कडकडीत लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावले आहे. यादरम्यान अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. गतवर्षीच्या लॉकडाऊनप्रमाणेच यावेळीही राज्यात प्रवासासाठी पुन्हा एकदा ई-पासची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात प्रवासासाठी ई-पास कसा काढावा, तो कुठे मिळतो, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे गरजेची आहेत, याची माहिती येथे देत आहोत.. Know How to Apply For Travel E-pass In Maharashtra during lockdown, read step by step process


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात झाला आहे. यामुळे राज्य सरकारने दि. 22 एप्रिल रोजी रात्री 8 वाजेपासून 1 मेपर्यंत राज्यात कडकडीत लॉकडाऊन  (Maharashtra Lockdown) लावले आहे. यादरम्यान अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. गतवर्षीच्या लॉकडाऊनप्रमाणेच यावेळीही राज्यात प्रवासासाठी पुन्हा एकदा ई-पासची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात प्रवासासाठी ई-पास कसा काढावा, तो कुठे मिळतो, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे गरजेची आहेत, याची माहिती येथे देत आहोत..

    कसा काढाल ई-पास?

    (How to Apply For Travel E-pass) राज्यात लॉकडाऊनच्या काळात आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास गरजेचा झाला आहे. केवळ अत्यावश्यक कारणांसाठीच ई-पास मंजूर करण्यात येणार आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या अत्यंत महत्त्वाच्या खासगी कामांसाठी ही परवानगी काढणे गरजेच आहे. 22 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. यामुळे तेव्हापासूनच राज्यात प्रवास, कार्यालयीन कामातील हजेरी, विवाह सोहळ्यांसह इतरही अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. हे सर्व नियम सध्यातरी 1 मेपर्यंतच हे नियम लागू असतील. त्यामुळे या काळात तुम्हाला राज्यांतर्गत प्रवास करायचा असेल तर ई-पास काढावा, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.

    ई-पाससाठी स्टेप बाय स्टेप गाइड

    • ई-पास काढण्यासाठी सर्वात आधी https://covid19.mhpolice.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.
    • वेबसाइट ओपन झाल्यावर तुम्हाला ‘Apply For Pass Here’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
    • यानंतर तुम्हाला दुसऱ्या राज्यात जायचे असेल तर हो असा पर्याय निवडायचा आहे. नसेल तर नाही हा पर्याय निवडावा.
    • प्रवाससाठीच्या पासमध्ये तुम्हाला तुमचे जिल्हा पोलीस मुख्यालय निवडायचे आहे.
    • यानंतर स्वत:चे संपूर्ण नाव टाकायचे आहे.
    • कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत प्रवास करायचा आहे ती तारीख निवडावी लागेल.
    • याच ऑनलाइन फॉर्मवर तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांक, प्रवासाचे कारण, उद्देश, ज्या वाहनाने प्रवास करायचा आहे त्या वाहनाचा प्रकार, वाहन क्रमांक या बाबी नमूद कराव्या लागतील.
      याशिवाय तुम्हाला सध्याचा पत्ता, ईमेल आयडी, प्रवास कुठून सुरू होणार, अंतिम ठिकाण, प्रवाशांची संख्या, प्रवासाच्या अंतिम ठिकाणचा पत्ता आदी बाबी नमूद कराव्या लागतील.
      एवढेच नाही, तर तुम्ही कंटेन्मेंट झोनमधील आहात की नाही, हा पर्यायही निवडायचा आहे. तुम्ही जर परतीचा प्रवास त्याच मार्गाने करणार असाल तर तेही नमूद करावे लागेल.
    • या पेजवर खाली तुम्हाला ई-पास साठी आवश्यक फोटो व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
    • स्वत:चा फोटो, मेडिकल रिपोर्ट, संस्थेचे अथवा कंपनीचे ओळखपत्र किंवा आधार कार्ड अपलोड करायचे आहे.
    • डॉक्टरांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी वेगळे बटण दिलेले आहे.

    हे जरूर लक्षात ठेवा…

    कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करा. अर्ज केल्यानंतर एक टोकन आयडी तुम्हाला मिळेल. या टोकन आयडीच्या मदतीने तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या प्रक्रियेत आहे हे कळू शकेल. अर्जाची स्थिती तुम्ही याद्वारे जाणून घेऊ शकाल.
    – तुमच्या अर्जाचे व्हेरिफिकेशन पूर्ण होताच याच टोकन आयडीच्या मदतीने तुम्हाला ई-पास डाऊनलोड करता येईल.
    – आता प्रत्यक्ष प्रवास करताना पासची मूळ प्रत सोबत बाळगा. सॉफ्ट कॉपीही असू द्या. पोलिसांनी चौकशी केल्यावर त्यांना हा पास दाखवू शकता.

    कोणत्या कारणांसाठी ई-पास मिळेल?

    – ई-पास मिळण्यासाठी म्हणजेच इतर जिल्ह्यांत प्रवासासाठी शासनाने फक्त तातडीच्या व महत्त्वाच्या कारणांनाच परवानगी दिली आहे. लग्न सोहळा, जवळच्या व्यक्तींचा अंत्यविधी, वैद्यकीय उपचार, अडकलेले विद्यार्थी अशा कारणांसाठी ई-पास मिळू शकतो.
    – तथापि, शासनाने आदेशात नमूद केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासाकरिता ई- पास गरजेचा नाही.

    ज्यांना ऑनलाइन जमत नाही, त्यांनी काय कराव?

    – ज्या व्यक्तींना ऑनलाइन ई-पास काढण्यात अडचणी येत असतील, त्यांना जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे दाखवून ई-पास मिळू शकतो.

    Know How to Apply For Travel E-pass In Maharashtra during lockdown, read step by step process

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!