विशेष प्रतिनिधी
मुंबई : आजच्या डिजिटल युगात बहुतांश गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. बँकेशी संबंधित बरीच कामे ऑनलाइन झाली आहेत. मोबाईल बँकिंगची सुविधा खूप सोपी झाली आहे. असे असूनही बँकेशी संबंधित अनेक कामे आहेत, ज्यासाठी शाखेत जाणे आवश्यक आहे. चेक क्लिअरन्स, लोन, डिमांड ड्राफ्टसारख्या सेवांसाठी शाखेला भेट द्यावी लागते. Know About Bank Holidays in September 2021
अशा स्थितीत जर तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर तुम्हाला बँकेच्या सुट्ट्यांची माहिती ठेवावी लागेल. असे होऊ नये की तुम्ही महत्त्वाच्या कामानिमित्त गेला आणि त्या दिवशी बँक बंद आहे. येथे आम्ही तुम्हाला बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी देत आहोत. अशा प्रकारे तुम्ही आपल्या कामाचे नियोजन करू शकाल.
प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक रविवारव्यतिरिक्त, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांची सार्वजनिक सुट्टी असते. यासह येथे आम्ही तुम्हाला सप्टेंबर 2021 मध्ये कोणत्या तारखांना बँकांमध्ये सुट्टी असेल ही माहिती देत आहोत.
या तारखांना बँका राहतील बंद
5 सप्टेंबर 2021: रविवार
सप्टेंबर 8, 2021: श्रीमंत शंकरदेव तिथी असल्याने अनेक बँकांमध्ये सुट्टी.
सप्टेंबर 9, 2021: सुहाग पर्व तीज असल्याने अनेक बँकांना सुट्टी.
10 सप्टेंबर 2021: गणेश चतुर्थी आहे. मोठ्या सणामुळे बँकेला सुट्टी.
11 सप्टेंबर, 2021: दुसरा शनिवार.
12 सप्टेंबर, 2021: रविवार.
सप्टेंबर 17, 2021: कर्मा पूजेमुळे अनेक बँकांना सुट्टी.
सप्टेंबर 19, 2021: रविवार.
20 सप्टेंबर, 2021: इंद्र जात्रा असल्यामुळे अनेक बँकेत सुट्टी.
सप्टेंबर 21, 2021: नारायण गुरू समाधी दिनामुळे अनेक बँकेत सुट्टी.
25 सप्टेंबर, 2021: चौथा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी.
26 सप्टेंबर, 2021: रविवार.
सर्व बँकांना या सुट्या असतील असे नाही
सप्टेंबर महिन्यात बँका 12 दिवस बंद राहणार आहेत. 8, 9, 10, 11, 17, 20 आणि 21 सप्टेंबरच्या सुट्ट्या आरबीआयने ठरवल्या आहेत, त्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट अंतर्गत आहेत. यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून या तारखा लक्षात ठेवा, अन्यथा तुमचे बँक संबंधित काम अडकू शकते. सध्या जवळजवळ सर्व बँका त्यांच्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सुविधा पुरवत आहेत. यासह ग्राहकांचे बँकिंगशी संबंधित बहुतेक काम घरी बसून पूर्ण केले जाते. तथापि, बरेच ग्राहक डिजिटल फ्रेंडली नसतात आणि त्यांच्या कामासाठी बँक शाखांवर अवलंबून असतात. त्याचबरोबर, डिजिटल स्मार्ट ग्राहकांनादेखील चेक क्लीयरन्स, लोन, डीडीसारख्या काही सेवांसाठी बँक शाखेला भेट द्यावी लागते.
Know About Bank Holidays in September 2021
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Vaccination : कोरोनाविरुद्ध लसीकरणाचा देशात नवा विक्रम, एका दिवसात ९३ लाखांहून जास्त डोस दिले
- दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय, वाजपेयी-जेटली यांच्या नावांनीही केंद्रांची उभारणी
- ओबीसी राजकीय आरक्षण बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्या सूचना… कोणत्या?… त्या वाचा…!!
- देशाचा जीडीपी 9.5% राहण्याचा अंदाज, महागाईसुद्धा कमी होणार – RBI गव्हर्नर शक्तिकांत दास
- Sarada Scam : शारदा घोटाळ्याच्या आरोपपत्रात तृणमूल सरचिटणीस कुणाल घोष यांचे नाव, घोष म्हणाले- केंद्राकडून सूड भावनेने कारवाई