• Download App
    समीर वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा, किरीट सोमय्या यांचा नबाब मलिक यांना इशारा|Kirit Somaiya's warning to Nawab Malik on Samir Wankhede statement

    समीर वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा, किरीट सोमय्या यांचा नबाब मलिक यांना इशारा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी तुमची खैर नाही, असा इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अल्पसंख्याक विकासमंत्री नबाब मलिक यांना दिला आहे.Kirit Somaiya’s warning to Nawab Malik on Samir Wankhede statement

    समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल. तुझा तुरुंगवास निश्चित आहे. राज्यातील जनता पाहतेय. वानखेडेची बोगसगिरी जनतेसमोर आणणार. त्याचा बाप बोगस होता, हा बोगस आहे, याच्या घरातील सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो की यात माझं काही नाही.



    माझ्यावर दबाव होता. मग तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या बापाचं नाव सांग. कोणत्या बापाच्या सांगण्यावरुन हे करतोय? तुझा बाप कोण याचं उत्तर दे. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असे मलिक म्हणाले होते.

    या पार्श्वभूमीवर मलिक यांना इशारा देताना किरीट सोमय्या म्हणाले, नवाब मलिक हे राज्यातल्या सरकारचे मंत्री आहेत. ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत की ड्रग माफियांचे प्रवक्ते आहेत? समीर वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला, तरी तुमची खैर नाही.

    अजित पवार यांच्यावर टीका करताना सोमय्या म्हणाले, जरंडेश्वर साखर कारखान्याचे खरे मालक हे अजित पवार, सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या बहिणी आहेत.हिंमत असेल तर हायकोर्टात प्रतिज्ञापत्र द्या आणि माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करा.

    Kirit Somaiya’s warning to Nawab Malik on Samir Wankhede statement

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!