• Download App
    दिवाळीनंतर भ्रष्टाचाराबाबत फटाके फोडणार, तीन मंत्री आणि तीन जावयांचा पर्दाफाश करणार, किरीट सोमय्या यांचा इशारा|Kirit Somaiya warns of crackdown on corruption, exposes three ministers and three sons-in-law after Diwali

    दिवाळीनंतर भ्रष्टाचाराबाबत फटाके फोडणार, तीन मंत्री आणि तीन जावयांचा पर्दाफाश करणार, किरीट सोमय्या यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    अमरावती : दिवाळीनंतर भ्रष्टचाराबाबत फटाके फोडणार आहेत. तीन मंत्री आणि तीन जावई यांचा पर्दाफाश करणार असल्याचा इशारा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे.अमरावतीत पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले, त्यांनी लवंगी फटाके फोडले, मात्र मी एकदम बॉम्ब फोडणार आहठाकरे आणि पवारांनी महाराष्ट्रात वसुली सरकार निर्माण केले.Kirit Somaiya warns of crackdown on corruption, exposes three ministers and three sons-in-law after Diwali

    ठाकरे सरकारचे ३१ डिसेंबरपर्यंत ४० घोटाळे उघड करणार आहे. आतापर्यंत २८ घोटाळे समोर आणले आहेत. पुढील काही दिवसात ४ मंत्र्यांचे घोटाळे उघड करू. त्यांच्याबाबत वेगवेगळे तपास संस्थांना मी तक्रारी केल्या आहेत. या ४ नेत्यांमध्ये २ शिवसेनेचे आहे.



    हे २ जण मुख्यमंत्र्यांच्या मित्रपरिवाराचे महत्त्वाचे सदस्य आहेत. यात काँग्रेसच्या विदर्भातील कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे. त्याची फाईल पण आलीय. सर्व तपास यंत्रणांना कागदपत्र आणि तक्रारी पाठवल्या आहेत. चौथे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत.घोटाळेबाज ठाकरे-पवारांनी १२ दिवस नाटकं केली.

    यात ३ मंत्र्यांच्या ३ घोटाळ्यांचा आणि त्यांच्या ३ जावयांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये जावयांचं राज्य आहे. अजित पवार यांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. हसन मुश्रीफांनी त्यांच्या जावयाला आणि नवाब मलिकांनी त्यांच्या जावयाला खूश केलं. एकदम बॉम्ब फोडण्याचं काम किरीट सोमय्या करणार आहे.

    Kirit Somaiya warns of crackdown on corruption, exposes three ministers and three sons-in-law after Diwali

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस