Kirit Somaiya Vs Shiv Sena : भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. नुकतेच त्यांनी 10 दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड घोटाळा बाहेर काढण्याचा दावा केला होता. आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आर्थिक कमाईसाठी लोकांना घाबरवून, कोविड सेंटरमध्ये घोटाळा सुरू आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाला वरळीतील कोविड सेंटरचं काम दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. आधी कंत्राट वाटले जाते आणि मग कंपन्या उभारल्या जातात, असेही ते म्हणाले. Kirit Somaiya Vs Shiv Sena Covid Center contract to Mayor Pednekar’s son, Covid Center is Shiv Sena’s source of income, serious allegations of Kirit Somaiya
प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. नुकतेच त्यांनी 10 दिवसांत ठाकरे सरकारचा कोविड घोटाळा बाहेर काढण्याचा दावा केला होता. आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आर्थिक कमाईसाठी लोकांना घाबरवून, कोविड सेंटरमध्ये घोटाळा सुरू आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मुलाला वरळीतील कोविड सेंटरचं काम दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. आधी कंत्राट वाटले जाते आणि मग कंपन्या उभारल्या जातात, असेही ते म्हणाले.
कोविड सेंटर हे शिवसेनेच्या कमाईचं साधन – सोमय्या
सोमय्या पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंच्या सेनेला कोविड सेंटर हे कमाईचे साधन आहे. म्हणून ओमायक्रॉन बाधितांचा आकडा वाढवून सांगत आहेत. वास्तविक, त्या २० हजार बाधितांपैकी १८ हजार हे लक्षणे नसलेले आहेत. १ जानेवारीपासून आतापर्यंत ४०० ते ५०० रुग्ण रुग्णालयात दाखल होतात आणि चार दिवसांमध्ये घरी जातात. घाबरण्याची गरज नाही. पण ठाकरे सरकारच्या सेनेला कोविड सेंटरचे कंत्राट मिळाले आहे.”
ते पुढे म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी 6 कोविड सेंटर कोणाला दिले हे जाहीर करावे. कोविड सेंटर उभं तर केलं आहे, पण रुग्ण कुठे आहे? मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर किरीट सोमय्या गांजा पिऊन बोलत असल्याचे म्हणतात. हो गांजा पिऊन हे बोलतो, किशोरी पेडणेकर यांनी स्वतःच्या कंपनीला कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट दिलं. मुंबई महापालिकेचे कोविड सेंटर चालवण्याचे कंत्राट मिळालेल्या कंपनीची स्थापना किशोरी पेडणेकरांनी केली. सध्या त्यांचा मुलगा साईप्रसाद पेडणेकर ही कंपनी चालवत आहे. वरळी येथील डोममधील कोविड सेंटरचे कंत्राट त्यांच्याकडे आहे. मुंबईतील सहा कोविड सेंटर शिवसेना नेत्यांना मिळाले आहे. आधी कंत्राट दिले गेले आणि त्यानंतर कंपन्या तयार करण्यात आल्या. लोकांच्या जिवाशी खेळण्याचे पाप ठाकरे सरकारने केलं.” असा गंभीर आरोपही सोमय्यांनी केला आहे.
दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या की, “घाबरवणे आमच्या रक्तात नाही आणि आम्हीसुद्धा घाबरत नाही. खुर्चीत गांजा मारून कुणालाही बोलता येते. पण परिस्थिती तपासून पाहताना आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला धाडस दिलं आहे. उद्याच्या मृत्यूला मी घाबरत नाही. त्यामुळे तेवढं धाडस आपण दाखवावं,” असंही त्या म्हणाल्या.
Kirit Somaiya Vs Shiv Sena Covid Center contract to Mayor Pednekar’s son, Covid Center is Shiv Sena’s source of income, serious allegations of Kirit Somaiya
महत्त्वाच्या बातम्या
- Varun Gandhi Corona Positive : वरुण गांधींना कोरोनाची लागण, ट्विट करून माहिती दिली, निवडणूक आयोगाकडे केली ही मोठी मागणी
- साहेब जादे जोरावर सिंग, फतेह सिंग यांचा शहीद दिवस 26 डिसेंबर यापुढे वीर बाल दिवस म्हणून साजरा होणार!!
- महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन : सोमवारपासून महाराष्ट्रात दिवसा कलम 144 आणि रात्री कर्फ्यू लागू, जाणून घ्या काय राहणार सुरू, काय राहणार बंद!
- पाचही राज्यांमध्ये लसीकरण वाढवा, रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे निर्देश
- पंतप्रधानांच्या सुरक्षेला धोका नव्हता; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी प्रियांका गांधींना केले ब्रीफिंग!!