विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जम्बो कोव्हिड सेंटर घोटाळ्याप्रकरणी कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांची तक्रार ८९ पानांची आहे. Kirit Somaiya Filed a jumbo 89 page complaint about Covid Center scam
या घोटाळ्याविरोधातील आरोपींवर सात दिवसात गुन्हा दाखल करा, नाहीत आझाद मैदान पोलिस ठाण्याच्या विरोधात कोर्टात तक्रार करणार असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. सोमय्या यांनी आज आझाद मैदान पोलीस ठाण्यात येऊन जम्बो कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी ८९ पानांची तक्रार दाखल केली. यावेळी अॅड. विवेकानंद गुप्ता त्यांच्यासोबत होते.
संजय राऊत यांचे कौटुंबिक पार्टनर सुजीत पाटकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने कोव्हिड पेशंटच्या जीवाशी खेळून कोरोड रुपयांचा खेळ केला. कंपनी अस्तित्वात नसतानाही बोगस कागदपत्रांद्वारे कंत्राट मिळवलं या सर्वांची माहिती पोलिसांना दिली असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.