• Download App
    औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरवरून किरीन रिजिजुंचे संकेत , म्हणाले - जे करायचय ते वेळेवर करूKirin Rijiju's hint from the renaming of Sambhajinagar in Aurangabad, said - we will do what we want to do on time

    औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरवरून किरीन रिजिजुंचे संकेत , म्हणाले – जे करायचय ते वेळेवर करू

    औरंगाबाद शहराच्या नावावरुन मागील कित्येक वर्षांपासून मोठा वाद आहे. शिवसेना तसेच भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करतात.Kirin Rijiju’s hint from the renaming of Sambhajinagar in Aurangabad, said – we will do what we want to do on time


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या औरंगाबाद शहराच्या नावावरून गेले अनेक दिवस उलट सुलट चर्चा सुरू आहेत. औरंगाबाद चे नामकरन करून शहराचे नाव संभाजीनगर करावे अशी अनेकांची मागणी आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या अतिरिक्त इमारतीचा उद्घाटन सोहळा शनिवारी औरंगाबादेत पार पडला.

    मात्र या दिवशी शहरात औरंगाबादचे संभाजीनगर हे नाव करण्यावरून झालेल्या वक्तव्यांचीच चर्चा जोरदार झाली.शासनाच्या एका पत्रकात संभाजीनगर छापून आल्याने खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले.

    कोर्टाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केंद्रीय विधी व न्यायमंत्री किरीन रिजिजू यांनी मात्र वेगळेच संकेत दिले. औरंगाबादच्या नामांतराबाबत जे काय करायचंय, ते वेळेवर करुच, असे सांकेतिक वक्तव्य करून त्यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.



    हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवा- इम्तियाज

    औरंगाबाद शहराच्या नावावरुन मागील कित्येक वर्षांपासून मोठा वाद आहे. शिवसेना तसेच भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करतात. तर काँग्रेससारख्या पक्षाने औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याला विरोध केलेला आहे. दरम्यान, एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका सरकारी परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख थेट संभाजीनगर अस करण्यात आलाय. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा धारण केला. जलील यांनी हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवा, असं म्हणत थेट आव्हान दिलं. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीदेखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.

    संभाजीनगर हा अजेंडा आहे आणि राहील- खैरे

    दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही या वादात प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीनगर हा शिवसेनेचे गेल्या अनेक वर्षांपासून अजेंडा आहे आणि भविष्यातही तो राहील. सामान्य नागरिकांनीदेखील संभाजीनगर हे नाव स्वीकारलेले आहे. जिल्ह्याचे नामकरण करणे ही तर जनभावना आहे. आम्ही जनभावनेसोबत राहू, जनभावनेचा आदर सर्वांनीच करायला हवा, असे वक्तव्य खैरे यांनी केले आहे.

    Kirin Rijiju’s hint from the renaming of Sambhajinagar in Aurangabad, said – we will do what we want to do on time

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस