• Download App
    Kiran Dagde Patil भाेर- वेल्हा- मुळशीत चमत्कार घडणार,  किरण दगडे पाटील आमदार हाेणार, प्रवीण तरडे यांचा विश्वास

    Kiran Dagde Patil भाेर- वेल्हा- मुळशीत चमत्कार घडणार,  किरण दगडे पाटील आमदार हाेणार, प्रवीण तरडे यांचा विश्वास

    Kiran Dagde Patil

     विशेष प्रतिनिधी

    भाेर : काेणताही पक्ष पाठीशी नाही. सरकारी याेजना, अनुदान पाठीशी नाही. खिशातून पैसे टाकून काम केले. ते काम दिसत आहे.  त्यामुळे  किरण दगडे पाटील आमदार हाेणार. चहाच्या किटलीतून विकासकामांचा गाेडवा घराघरात पाेहाेचविणार, भाेर- वेल्हा- मुळशीत चमत्कार घडणारच असा विश्वास प्रसिध्द अभिनेते प्रवीण तरडे यांनी व्यक्त केला.

    भाेर- वेल्हा – मुळशी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार किरण दगडे- पाटील यांच्या प्रचारार्थ भाेर येथे झालेल्या जंगी सभेत तरडे बाेलत हाेते. यावेळी किरण दगडे पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित हाेते. तरडे म्हणाले, एका अपक्ष उमेदवारासाठी एवढी गर्दी जमली आहे.

    किरणदादासाठी आलेले सगळे मातीतील आहेत. माणसाचे काम दिसले म्हणून येथे आला आहात. काेणताही पक्ष पाठीशी नाही. सरकारी याेजना, अनुदान पाठीशी नाही. खिशातून पैसे टाकून काम केले. ते काम दिसले म्हणून तुम्ही येथे आलाे. जाे गाेरगरीबांचा ताे माझा, हे माझे तत्व आहे. म्हणून  महाराष्ट्रात काेणत्याही पक्षाच्या प्रचाराला गेलाे नाही. परंतु, किरण दगडे पाटील यांच्या प्रचाराला  आलाे. याचे कारण म्हणजे किरण दगडे पाटील यांचे काम मी पाहिले आहे.

    तुम्हीही  किरण दगडे पाटील काय आहे हे पाहण्यासाठी पुण्यामध्ये येऊन बावधन, कोथरूडमध्ये फिरा. तेथल्या झाेपडपट्टीतील काेणत्याही बाईला जाऊन विचारा की किरण दगडे पाटील काेण आहे? ती बाई सांगेल किरण दगडे पाटील माझा भाऊ आहे. किरण दगडे पाटील साचलेले डबके नाही तर वाहता झरा आहे. हा झरा आपापल्या वावरात कसा वळवावा हे प्रत्येकाने पाहावे.  काशीयात्रेला नेणारा श्रावणबाळ आहे. त्याची कावड वडीलधाऱ्यांच्या विचारांना वाहून नेणारी असते. आपल्या धर्माचे खऱ्या अर्थाने काेण करत असेल तर किरण दगडे पाटील करत आहे.


    Bhaskar Jadhav रामटेकमधील बंडखोरीवरुन भास्कर जाधवांनी काँग्रेसला सुनावले; ही काँग्रेसची नैतिक जबाबदारी नाही का?


    भाेर- वेल्हा -मुळशी मतदारसंघात 23 नाेव्हेंबरला क्रांती हाेणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना तरडे म्हणाले, महाराष्ट्रात सुपरहिट झालेला किरण दगडे पाटील निर्माते असलेला मुळशी पॅटर्न हा चित्रपट 23 नाेव्हेंबर 2018 राेजी रिलीज झाला. हाेता.

    यंदाच्या 23 नाेव्हेंबरलाही संपूर्ण महाराष्ट्रात  किरण दगडे पाटील पॅटर्न हिट हाेणार आहे. भाेर- वेल्हा- मुळशी मतदारसंघातील जमीनी वाचविण्याचे काम किरण दगडे पाटील यांनी केल्याचे सांगताना तरडे म्हणाले, मी  ‘मुळशी पॅटर्न’ सारखा घरंदाज सिनेमा लिहून याच्या त्याच्या दारात जात हाेताे. सांगत हाेता की शेतकऱ्यांचा, त्यांच्या जमीनींचा विषय आहे. मला हा सिनेमा जगासमाेर आणण्यासाठी मदत करा अशी विनंती करत हाेताे. काेणीही मागे उभे राहिले नाही पण पहिला माणूस मागे उभा राहिला ताे किरण दगडे पाटील हाेता. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी वाचल्या.

    कवडीमाेलाच्या भावाने जमीनी विकत घेत हाेते. पण आज ते बदलले आहे. त्यामुळे जमीनी विकत वाचविणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभे राहा. मी लहान भाऊ म्हणून मतदारसंघातील प्रत्येक गावात फिरणार आहे. तरडे की गॅरंटी म्हणू  दगडे पाटील यांच्यासाठी मी त्याच्या वतीने शब्द देताे. क्रांती घडणार आहे 23 नाेव्हेंबरला आमदार किरण दगडे यांच्या विजयी सभेसाठी जमू. ताे चमत्कार भाेर- वेल्हा- मुळशीत घडणार आहे. प्रत्येक गावागावात दगडे पाटलासाठी फिरणार आहे. लहान भाऊ म्हणून प्रचार करणार आहे. .तरडे म्हणाले, हा नुसता आशेचा नाही तर तुमच्या आमच्या पाेरांच्या भविष्याचा किरण आहे.  किरण दगडे पाटील आमदार म्हणून निवडून येतील तेव्हा सगळ्या महाराष्टाचे लक्ष त्याच्याकडे असेल. कारण अपक्ष आमदारांना महत्व येणार आहे. त्यावेळी किरण दगडे पाटील पुन्हा काेणासाेबत जायचे हे विचारण्यासाटी तुमच्याकडे येणार आहे.

    Kiran Dagde Patil Set to Become MLA

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    म्हणे, शिंदे + अजितदादा कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; पण यात संजय राऊतांनी कोणता मोठ्ठा “जावईशोध” लावला??

    काकांनी सल्ला ऐकला नाही, आता अजितदादांचा के. पी. पाटलांना सल्ला; 84 चे होणार आहात, आता रिटायरमेंट घ्या!!

    Devendra Fadnavis : WAVES 2025 परिषदेमध्ये 8000 कोटींचे सामंजस्य करार; तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टीम!!