विशेष प्रतिनिधी
भोर : भोर तालुक्यात एमआयडीसी आली पाहिजे. आपल्या मुलांना नाेकरी मिळायला पाहिजे. मात्र येथील आमदारांची मानसिकता आहे की युवकांना कामधंदा भेटला, पैसे आले तर ते दारात येणार नाहीत असा आरोप करत भोर – वेल्हा – मुळशी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांनी केला. माझ्यावर विश्वास ठेवा. मला संधी द्या पाच वर्षांत सगळे प्रश्न साेडविल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले. Kiran Dagde Patil Accuses Sangram Thopte
रायरेश्वराचा आशीर्वाद घेऊन अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर भोर शहरात त्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी दगडे बोलत होते . सिनेअभिनेते आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासह हजारो समर्थक यावेळी उपस्थित होते.
दगडे पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेथे स्वराज्याची शपथ घेतली तेथे प्रचाराचा नारळ फाेडला. याठिकाणी जायला रस्ता नाही. मी ठरविले हाेते की भविष्यात जिंकेल, हरेल पण भव्य दिव्य मंदिर झाले पाहिजे. त्यासाठी मी काम करणार आहे.
रायरेश्वराच्या मंदिराला जागतिक दर्जा मिळवून देणार आहे. महाराजांच्या तालुक्याचे तुम्ही काय करून ठेवले आहे. हे तालुके नसते तर देश दिसला नसता. एवढे याेगदान आहे. पण विकास दिसत नाही. एसटी नाही, रस्ते नाहीत. काेणत्याही प्रकारचा विकास नाही.
दगडे पाटील म्हणाले, काल भाेरमध्ये बैठक घेतली. काही मुले म्हणाली शिक्षण घेऊनही आम्हाला हमाली करावी लागत आहे. हे एकून अक्षरश: रडायला आले. ते जीव ताेडून बाेलत हाेते. एवढी वर्षे यांनी राज्य केले. यांची इच्छा हाेत नाही का या मुलांसाठी काय करावे. एमआयडीसीचा प्रश्न साेडविणार आहे. युवक नोकरीसाठी पुणे, मुंबईत जातात. केवळ ज्येष्ठ येथे राहतात. धरण असूनही प्यायला पाणीनाही. हे प्रश्न काेण साेडविणार?
दगडे पाटील म्हणाले,एवढ्या माेठ्या संख्येने आपण माझ्यासोबत असताना पक्षाची गरज नाही.
Sanju Samson : संजू सॅमसनने डर्बनमध्ये शतक झळकावून इतिहास रचला
मी लढू नये यासाठी दबाव आणला. तुम्ही माघार घ्या, काय पाहिजे ते देताे असे सांगितले. काही झाले तरी लढायचे असे किती खर्च झाला, काेणते पद पाहिजे ते सांगा म्हणाले. त्यांना एकच सांगितले काेणत्या पदासाठी, पैशासाठी उभा नाही. रायरेश्वरावर शपथ घेतली आहे. जनतेचे प्रश्न, रायरेश्वराचा प्रश्न सोडवू लिहून दिले असते की रायरेश्वराचा, एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावू तर नक्की विचार केला असता. अजित पवारांना इशारा देताना दगडे पाटील म्हणाले,
महायुतीकडून उमेदवारी फायनल हाेती. मात्र अजित पवार महायुतीत आल्याने मिळाली नाही. अजित पवार यांच्यासाठी जीव ताेडून लाेकसभेला काम केले. आमचे अजून भाजपवर प्रेम आहे. त्याची ही परतफेड केली का? अजितदादा सहा मतदारसंघात काम करणार नाही म्हणून मला निलंबित करता का? आम्हाला अजूनही भाजपसाठी काम करायचे आहे. \
तुम्ही सत्तेत येण्यासाठी आमचा बळी देणार का? कारवाई केली तर माझी पण दाेन मतदारसंघात ताकद आहे. त्रास द्यायचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम भाेगावे लागतील.भाेर शहरात बैठक घेतली तर महिला भगिनींनी त्रास दिला जातो. मुळशी तालुक्यात गुंड फिरत आहेत. पाेलीसांना आमची विनंती आहे की आमच्या कार्यकर्त्यांना संरक्षण द्या. अन्यथा आम्ही आमच्या पध्दतीने उत्तर देऊ. मी तुमच्या साेबत आहे. आपल्या देशात काही हुकूमशाही नाही.
Kiran Dagde Patil Accuses Sangram Thopte
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis व्होट जिहादविरोधात एकत्रित मतदान करण्याची गरज, विरोधकांची स्ट्रॅटेजी ओळखा; देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक भाषण
- Sunil Tatkare राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 नेत्यांचे पक्षातून निलंबन; प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची कारवाई
- Between the lines : अजितदादा सत्तेची वळचण सोडणार नसल्याचा पवारांचा खुलासा; दिला ईडी + सीबीआयचा हवाला!!
- Kirit Somayya : ‘व्होट जिहाद’वरून राजकारण तापले; किरीट सोमय्या यांनी केली ‘ही’ मागणी